साखर उद्योग गौरव पुरस्कार प्राप्त माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा उदगीर काँग्रेस तर्फे सत्कार

0
साखर उद्योग गौरव पुरस्कार प्राप्त माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा उदगीर काँग्रेस तर्फे सत्कार

साखर उद्योग गौरव पुरस्कार प्राप्त माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा उदगीर काँग्रेस तर्फे सत्कार

उदगीर (प्रतिनिधी) : द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडिया यांच्या वतीने देशातील साखर उद्योगात देण्यात येणारा अतिशय प्रतिष्ठित पुरस्कार राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांना देशपातळीवरिल साखर उद्योग गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यामुळें लातूरकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या अनुषंगाने उदगीर काँग्रेस कमिटीच्या वतीने दिलीपरावजी देशमुख यांचा सत्कार केला.

दिलीपराव देशमुख यांच्या पुरस्कारामुळे लातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा – सौ. उषा कांबळे

यावेळी बोलताना उषा कांबळे म्हणाल्या की लातूरच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलनारे, सामाजिक, राजकीय, संगीत, सांस्कृतिक, कला, अध्यात्मिक क्षेत्रात आपले वेगळेपण जपनारे एक कुशल प्रशासक लातूरचे भूषन म्हणून ओळख असलेल्या सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांना नुकताच मानाचा साखर उद्योग गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामुळें लातूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यात मांजरा साखर परिवाराने अत्यंत सूक्ष्म नियोजन करत पारदर्शकता ठेवून १० साखर कारखाने चालवले, तेही नफ्यात व शेतकऱ्यांना अधिक भाव देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे जिल्ह्यांत व्यापार वाढला, लोकांना रोजगार मिळाला आहे. त्याचे श्रेय दिलीपरावजी देशमुख यांच्याकडे जाते. संपूर्ण जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला मार्गदर्शन करणारा एक अनुभवी आणि दूरदृष्टी असलेला नेता म्हणून सहकार क्षेत्रातील प्रत्येक जण दिलीपराव देशमुख यांच्याकडे पाहतोय असे सांगितले. याप्रसंगी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस उषा कांबळे यांच्या समवेत तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याणराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे संचालक संतोष बिरादार पंचायत समितीचे माजी सदस्य बबन धनबा विधीज्ञ पद्माकर उगीले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed