संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासन दिन
संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासन दिन
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त सातवीच्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन घेण्यात आला.
प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पाचवी अ वर्गातील विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व गुरुजनांचा स्वतःच्या हाताने बनवलेले ग्रीटिंग व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापक म्हणून नोमान शेख, सिद्धी वाघमारे तर उपमुख्याध्यापक म्हणून श्रेया जवणे,विशाल मुळे पर्यवेक्षक म्हणून महेश उगिले, सोहम फुलारी, अजित पाटील तर लिपिक म्हणून आरदवाड आर्यन,ऋतुजा सत्तरवार सेवक म्हणून वेदांत पंचारे, नाळापुरे विठ्ठल, राजवीर भालेराव यांनी छान काम पाहिले. शाळेचा एक दिवसीय स्वयंशासन दिन खूप उत्कृष्ट घेतल्याबद्दल संस्थाध्यक्ष मा. गणेश दादा हाके पाटील संस्थेच्या सचिव प्राचार्या रेखाताई हाके-तरडे, उपाध्यक्षा अँड.मानसी हाके शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे, मुख्याध्यापिका मीनाक्षी तोवर सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.
