छाया न्यूट्रिशन सेंटरचे प्रशिक्षणार्थी अंबादास अल्लमखाने यांनी वजन कमी केल्याबद्दल बक्षीसास पात्र
उदगीर (प्रतिनिधी) : येथील छाया न्यूट्रिशन सेंटरचे प्रशिक्षणार्थी अंबादास अल्लामखाने यांनी आपले दोन महिन्यात 14 किलो वजन कमी करून, चौथ्या क्रमांकाचे बक्षीस नुकतेच पटकावण्यात यश प्राप्त केलेले आहे. उदगीर येथे देगलूर रोडवर छाया न्यूट्रिशन सेंटर हे शेटकर कॉम्प्लेक्स मध्ये आहे. येथे न्यूट्रिशनच्या माध्यमातून चहा व नाश्ता दिला जातो. त्याचबरोबर वर्कआउट पण घेतले जाते. यावेळी उदगीर येथील पत्रकार अंबादास अल्लमखाने यांनी यावरील न्यूट्रिशन मध्ये आपले नाव नोंदणी केले. नोंदणी करून दोन महिने झालेले आहे. या दोन महिन्यात त्यांनी न्यूट्रिशनच्या माध्यमातून चहा व नाश्ता त्याचबरोबर वर्कआउट पण केलेले होते. या दोन महिन्याच्या काळात त्यांनी आपले 14 किलो वजन कमी केलेले आहे. परवाच न्यूट्रिशनच्या माध्यमातून वजन कमी करण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये अनेक तालुका व जिल्हा या ठिकाणच्या प्रशिक्षणार्थी यांनी सहभाग घेतलेला होता. या स्पर्धेमध्ये पत्रकार अंबादास अल्लमखाने यांनी चौथा क्रमांक मिळवून उदगीर व छाया न्यूट्रिशन सेंटरचे नावलौकिक केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल छाया न्यूट्रिशन सेंटर उदगीर व पत्रकार अंबादास अल्लमखाने यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. या न्यूट्रिशनच्या संचालिका सौ. छायाताई साबणे यांनी बोलताना असे सांगितले की, आपण या न्यूट्रिशन मध्ये सहभागी होऊन, प्रत्येकाने आपल्या आरोग्याची व अनेक आजाराची काळजी घ्यावी, असे सांगितले.