यशवंत उर्फ बाळू केंद्रे यांची राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील थोडगा रोड वरील चामे गार्डन येथे राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) काँग्रेस पार्टीची जनसन्मान यात्रा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात अहमदपूर शहरात नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी अहमदपूर बाजार समितीचे संचालक यशवंत उर्फ बाळू केंद्रे यांची राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या लातुर जिल्हाध्यक्ष पदी निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या हस्ते देऊन नियुक्ती करण्यात आली.
यावेळी प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे,क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे अहमदपूर -चाकुर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील ,माजी मंत्री बाळासाहेब जाधव ,महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर, आ. विक्रम काळे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, सिद्धी शुगरचे कार्यकारी संचालक अविनाश जाधव, जिल्हा अध्यक्ष अफसर बाबा शेख आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवडीबद्दल अहमदपूर बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे, माजी जि.प सदस्य माधवराव जाधव, मुजीब पटेल जहागीरदार , शिवाजीराव देशमुख , प्रशांत भोसले, सुदर्शन मुंडे शिवाजी खांडेकर, किशन पाटील, अझहर बागवान, दयानंद पाटील, आशिष तोगरे ,बालाजी चाटे, अशोक सोनकांबळे, नारायण नागमोडे,रहीम खान पठाण, शेख इलियास, अॅड सादिक शेख, बदणे सर, तानाजी राजे, चोपणे सर, श्याम देवकते, हुसेन मणियार आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.