अहमदपूर- चाकूर तालुक्यातील 50 दुर्गम गावे काँक्रीट रस्त्याने राष्ट्रीय महामार्गाशी जोडली जाणार

0
अहमदपूर- चाकूर तालुक्यातील 50 दुर्गम गावे काँक्रीट रस्त्याने राष्ट्रीय महामार्गाशी जोडली जाणार

अहमदपूर- चाकूर तालुक्यातील 50 दुर्गम गावे काँक्रीट रस्त्याने राष्ट्रीय महामार्गाशी जोडली जाणार

टू लेन सिमेंट काँक्रीट रस्त्याची शंभर किलोमीटर लांबी व 550 कोटी बजेट..

अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर चाकूर तालुक्यातील सांगवी अंधोंरी, किनगाव ,कारेपूर रेनापुर या व चाकूर तालुक्यातील चाकूर ,शेळगाव किनी येल्लादेवी,वाढवणा ,अतुनुर या दोन सिमेंट काँक्रीट रस्त्यांना मंजुरी मिळून टेंडरिंग चे काम पूर्ण झाले आहे. या दोन्ही मिळून रस्त्याचे शंभर किलोमीटर लांबी आहे. रस्त्यासाठी 550 कोटीचे बजेट ही मंजूर करण्यात आले आहे. यामुळे या दोन्ही तालुक्यातील दुर्गम भागातील जवळपास 50 गावे या रस्त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाची जोडली जाणार आहेत. तालुक्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी पाठपुरावा करून हे मार्ग मंजूर करून घेतले आहेत. या रस्त्यामुळे त्यांच्या काळातील रस्ते वाहतुकीचा हा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्णत्वास जात आहे. यासाठी अंधोरी आणि परिसरातील ग्रामस्थांनी आमदार बाबासाहेब पाटील यांचे आभार ही मानले आहेत.

या रस्त्यासाठी अनुक्रमे 310 कोटी व 241 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र स्टेट इन्फ्रा स्ट्रक्चर डेव्हलपमेंट कार्पोरेशन द्वारा हे काम करण्यात येणार असून रस्ता सुधारणा व रुंदीकरणांमध्ये पहिला रस्ता सांगवी, उजना, गंगा हिप्परगा ,सुमठाणा , वंजारवाडी ढाळेगाव, अंधोरी ,किनगाव, कारेपूर रेणापूर हा 60.700 किलोमीटर लांबीचा टू लेन सिमेंट काँक्रीट रस्ता आहे.
तर चाकूर तालुक्यातील शेळगाव ,किनी यल्लादेवी, वाढवणा गुत्ती, घोंनशी, अतनुर हा 43.600 किलोमीटर एवढा लांबीचा रस्ता आहे.
या दोन्ही रस्त्यामुळे अहमदपूर तालुक्याच्या च्या सीमावरती गावाना व या भागातील प्रवाशांनाही फायदा होणार आहे यामुळे इतर शहरे कमी अंतराने जोडले जाणार आहेत.
वर्षानुवर्ष या भागातील लोकांना रस्त्याची अडचण होती मात्र आता ही गावे सुलभ रस्त्याने राष्ट्रीय महामार्गाशी जोडली जाणार आहेत. त्यामुळे यांचा चांगल्या कायमस्वरूपी रस्त्याचा प्रश्न मिटला आहे.

कोट

टू लेन्स सिमेंट काँक्रेट मार्गामुळे अंधोंरी भागातील गावे नांदेड, लातूर आंबेजोगाई शहराशी व एन एच 361, 548D,752K,548B, या महामार्गाची जोडी जाणार आहेत. हा मार्ग तयार झाल्यानंतर ग्रामीण भागाची दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत होऊन या गावांच्या कृषी विकासाला चालना मिळणार आहे.

बापूराव सारोळे
ग्रामस्थ व चेअरमन
अंधोंरी तालुका अहमदपूर.
कोट

शेळगाव, बोथी, राचन्ना वाडी, डोंगरज, चवळेवाडी, किनी यल्लादेवी
यासारखी गावे ज्यांना वर्षानुवर्ष चांगले रस्ते नव्हते ही सर्व गावे आता या मार्गामुळे चांगल्या रस्त्याने राष्ट्रीय महामार्गाशी जोडली जाणार आहेत.
या मार्गामुळे या भागातील शेतकऱ्यांना मोठा बाजारपेठेपर्यंत जलद गतीने आपली उत्पादने नेता येतील. यामुळे या ग्रामीण भागाच्या विकासास मदत होणार आहे
हावगी राव चवळे
चवळेवाडी, तालुका चाकूर.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed