अहमदपूर शहरात १३ कोटी ६० लाख रूपयांच्या सिमेंट रस्ते व नाली कामाचे आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्धाटन

0
अहमदपूर शहरात १३ कोटी ६० लाख रूपयांच्या सिमेंट रस्ते व नाली कामाचे आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्धाटन

अहमदपूर शहरात १३ कोटी ६० लाख रूपयांच्या सिमेंट रस्ते व नाली कामाचे आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्धाटन

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरात १३ कोटी ६० लाख रुपये यांच्या सिमेंट रस्ते व नाली कामाचे उद्घाटन आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शहरामध्ये शनिवार व रविवार (ता. आठ) या दोन दिवशी काँक्रीट रस्ता व नालीचे एकोणीस व एकोणचाळीस असे एकूण 58 ठिकाणच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये प्रभाग क्रमांक दोन, तीन, चार, पाच, सात, आठ, नऊ यामधील सिमेंट काँक्रेट रस्ता व नालीच्या कामाचा समावेश आहे. यावेळी आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले अहमदपूर शहरात कोणताही रस्ता मजबुतीकरण शिवाय राहणार नाही. शहरामध्ये मागेल त्या ठिकाणी रस्ता उपलब्ध करून दिला आहे. या पंचवार्षिक काळात जवळपास 95% रस्ते शहरातील सिमेंट काँक्रेटचे बनवले असून शिल्लक राहिलेले पाच टक्के रस्ते ही येणाऱ्या काळात मजबूत करावयाचे आहेत.

यावेळी शिवानंद हेंगणे, निवृत्तीराव कांबळे, गोपाळराव माने, शिवाजीराव देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष रोडगे, अझहर बागवान, दयानंद पाटील, अभय मिरकले, इलियास सय्यद यांची उपस्थिती होती.
शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील रस्त्याची मागणी मागील दहा वर्षापासून होती. या कालावधीमध्ये अनंत अडचणीला सामोरे जावे लागले, आज या सिमेंट काँक्रेट रस्त्याचे उद्घाटन होत असल्याने आम्हा कॉलनीमधील सर्व रहिवाश्यांना मोठा आनंद होत आहे… संतोष रोडगे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, अहमदपूर.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed