अहमदपूरात श्री गणेश भक्तांचा जल्लोष आनंदोत्सवाने बाप्पांची प्रतिष्ठापना!

0
अहमदपूरात श्री गणेश भक्तांचा जल्लोष आनंदोत्सवाने बाप्पांची प्रतिष्ठापना!

अहमदपूरात श्री गणेश भक्तांचा जल्लोष आनंदोत्सवाने बाप्पांची प्रतिष्ठापना!

अहमदपूर (गोविंद काळे) : गणपती बाप्पा मोरया…. मंगलमूर्ती मोरया, या जयघोषाने बँड, बाजा, ढोल- ताशा, आणि डीजेच्या निनादात… गुलाब व पुष्पवृष्टीची उधळण करत अगदी उत्साहवर्धक व शांतताप्रिय वातावरणात बाप्पांच्या भक्तांनी जल्लोषाने आपल्या घरोघरी व सार्वजनिक गणेश मंडळाने आपल्या आवडत्या बाप्पांच्या मूर्तीची मंगळवार दि. ०७ रोजी वाजत- गाजत उत्साहात प्रतिष्ठापना केली.
१४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाप्पांच्या भक्तांनी मूर्ती प्रतिष्ठापना करण्यासाठी श्रीफळ, गुलाल, अष्टगंध, हळद- कुंकू, अक्षता, खारीक, वाटी, सुपारी, बदाम, हळकुंड, नवीन कापड, कापसाची वस्त्रमाळ, तांदूळ, बेल, दुर्वा, पुष्पहार, फुले, विड्याची पाने, कलश, समई, वाती, निरांजन, आणि कापूर आदी साहित्याची जमवा- जमव करून उत्साही वातावरणात भक्तीभावाने श्रीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.
सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत बँड, बाजा, ढोल, ताशा, डीजे यांच्या निनादात वाजत- गाजत मिरवणुकीने, पूजाअर्चा करून आपल्या आवडत्या श्रीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. यावेळी गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया या जयघोषाने गुलाल, पुष्पवृष्टीची उधळण करत, युवा वर्ग आणि बच्चे कंपनीनी द्विगुणीत आनंद साजरा केला.
अहमदपूर शहरातील बाल सार्वजनिक गणेश मंडळ, आजोबा गणेश मंडळ, पंजोबा गणेश मंडळ, राजस्थान गणेश मंडळ, सार्वजनिक गणेश मंडळ, मराठवाडा गणेश मंडळ, व्यापारी गणेश मंडळ, नाथ गणेश मंडळ, संत चुडामणी गणेश मंडळ, तीपण्णा गणेश मंडळ, सुराज्य सार्वजनिक गणेश मंडळ आदी मानाच्या गणेश मंडळासह शहरातील सर्व लहान मोठ्या गणेश मंडळाने पोलिसांनी घालून दिलेल्या नियमाचे काटेकोर पालन करत श्रीची मिरवणुकीद्वारे विविध समाजपयोगी देखाव्याने, बाप्पांना प्रतिष्ठापनाच्या स्थळावर नेऊन विधीवत पूजा करून प्रतिष्ठापनेचा आनंद साजरा केला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed