अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; दोघां विरुद्ध अहमदपूर पोलीसात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

0
अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; दोघां विरुद्ध अहमदपूर पोलीसात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

अहमदपूर ( गोविंद काळे ) तालुक्यातील एका गावामधील दोन तरुणांनी एका अल्पवयीन मुलीला रात्री आठ वाजता मोबाईल फोन फोन करुन घरा बाहेर बोलावुन गावा बाहेरील पुलावर घेऊन जाऊन वाईट हेतुने स्पर्श केला असल्याची घटना दि ६ सप्टेंबर रोजी घडली असुन अहमदपूर पोलीसात दोन तरूणां विरुद्ध बाल लैगिक प्रतिबंध कायदा पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे

याविषयी पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की अहमदपूर तालुक्यातील एका गावात गावातील दोन तरूणांनी दि ६ सप्टेंबर रोजी गावातीलच एका अल्पवयीन मुलीला रात्री आठ वाजता मोबाईलवर फोन करून घराबाहेर बोलावुन घेतले व मोटार सायकलवर बसवुन गावाबाहेर असलेल्या एका पुलावर घेऊन गेले व त्यातील एकाने मी तुझ्यावर प्रेम करतो तु माझ्या सोबत चल म्हणाला असता मुलीने नकार देताच वाईट हेतुने मुलीच्या हाताला धरून जवळ ओढले मुलीने नकार देताच मुलीच्या गालावर चापटा मारून जिवे मारण्याची धमकी दिली तेव्हा मुलगी म्हणाली मला घरी नेऊन सोड नाही तर मी आरडा ओरडा करेल तेव्हा त्याने व त्याच्या मित्राने त्या मुलीला घरी नेऊन सोडले हा घडलेला सगळा प्रकार मुलीच्या आजोबाला कळला असता जाब विचारण्यासाठी गेलेल्या आजोबाला तरुणांनी जिवे मारण्याची धमकी दिली अल्पवयीन पिडीतीने दिलेल्या फिर्यादी वरून अहमदपूर पोलीसांत दोन तरुणाविरूध्द भारतीय न्याय दंड संहिता कलम 74, 352 ,351 व बाल लैंगिक प्रतिबंध कायदा पोस्को अंतर्गत 2012 ,8/ 12 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक ए एन श्रीमंगले हे करत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *