शासकीय दूध भुकटी भंगार विक्री प्रक्रिया थांबवा – मागणी

0
शासकीय दूध भुकटी भंगार विक्री प्रक्रिया थांबवा - मागणी

शासकीय दूध भुकटी भंगार विक्री प्रक्रिया थांबवा - मागणी

उदगीर (प्रतिनिधी) : येथील शासकीय दूध योजना आणि दूध भुकटी प्रकल्पाच्या भंगार विक्रीसाठी शासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. जोपर्यंत या ठिकाणी नवीन प्रकल्प मंजूर होत नाही, तोपर्यंत भंगार विकू नये. अशा मागणीचे निवेदन शासकीय दूध योजना पुनरुज्जीवन समितीने उपविभागीय अधिकारी यांना दिले आहे.
उदगीर येथील दूध डेरी आणि दूध भुकटी प्रकल्पाचे भंगार विकण्याची शासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. शासकीय दूध योजनेचे पुनरुज्जीवन करावे, यादृष्टीने दूध योजना पुनर्जीवन समिती च्या वतीने वेळोवेळी विविध राजकीय नेत्यांना आणि महाराष्ट्रातील मंत्र्यांना तसेच केंद्रातील मंत्र्यांना भेटून विनंती केली आहे. तत्कालीन केंद्रीय दुग्ध मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे उदगीर येथे येऊन त्यांनी प्रकल्प पुनर्जीवित करण्याच्या आश्वासन दिले होते. मात्र या संबंधात केंद्र शासनाच्या स्तरावर हालचाली सुरू आहेत. असे असले तरीही राज्य शासनाच्या वतीने हा प्रकल्प भंगारात काढण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप युवा नेते स्वप्निल जाधव यांनी केला होता. त्या अनुषंगाने शासकीय दूध योजना पुनरुज्जीवन समितीने संबंधित विभागाला भंगार विक्री प्रक्रिया थांबवण्याची विनंती केली आहे. जोपर्यंत या ठिकाणी नवीन प्रकल्प मंजूर होत नाही, तोपर्यंत या ठिकाणचे भंगार विकू नये. ही समितीची भूमिका आहे. शासनाने तात्काळ दूध डेरी आणि दूध भुकटी प्रकल्पाचे भंगार विकण्याची प्रक्रिया थांबवावी, अन्यथा समिती तीव्र आंदोलन करेल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. सदरील निवेदनावर समितीचे निमंत्रक आशिष पाटील, प्रा. एस एस पाटील, अहमद सरवर,चंद्रकांत टेंगेटोल इत्यादी सदस्यांच्या सह्या आहेत.
केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे इतका मोठा प्रकल्प भंगारात जातोय, याबद्दल उदगीरकरांना दुःख वाटत आहे. शेकडो तरुणांचा रोजगार बुडाला, शेतकऱ्यांना शेतीपूरक जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करता येत होता, तो थांबला. एका अर्थाने शेतकऱ्याची आर्थिक गोची झाली. हे सर्व थांबवण्यासाठी हा प्रकल्प पुन्हा सुरू झाला पाहिजे. अशी मागणी सर्वसामान्य नागरिकातूनही आता होऊ लागली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed