अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी व अज्ञाना विरूद्ध जनजागृती ‌करणे म्हणजे ‌साक्षरता – विश्वनाथ मुडपे

0
अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी व अज्ञाना विरूद्ध जनजागृती ‌करणे म्हणजे ‌साक्षरता - विश्वनाथ मुडपे

अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी व अज्ञाना विरूद्ध जनजागृती ‌करणे म्हणजे ‌साक्षरता - विश्वनाथ मुडपे

उदगीर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने उदगीर येथील जैद हाॉस्पिटल येथे महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन खात्यातील सेवानिवृत्त सहसंचालक डॉ.असगर शेख यांच्या अध्यक्षतेखाली‌ जागतिक फिजिओथेरपी दिन व जागतिक साक्षरता दिन साजरा करण्यात आला.प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक विश्वनाथ मुडपे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे चे उपाध्यक्ष बाबूराव माशाळकर,सचिव प्रा.डॉ.बळीराम भुक्तरे, पांडुरंग बोडके, माधव कल्याणकर, व्हि.एस.कुलकर्णी, ज्येष्ठ नागरिक संघाचे विश्वनाथ माळेवाडीकर, प्रसिद्ध व्यापारी रामराव मोमले, हरित वसुंधरा च्याचंद्रकला बिरादार इ.मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात उदगीर मधील प्रख्यात फिजिओथेरपिस्ट डॉ.जैद हमजा यांचा विविध संघटनांतर्फे हृद्य सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे विश्वनाथ मुडपे म्हणाले, साक्षरता म्हणजे, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी व अज्ञान नाहीसे ‌करण्यासाठी जन जागृती करणे होय.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पर्यावरण रक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी संविधान जागृती साठी विविध उपक्रम राबवून जनजागृती करते,समितीचे हे कार्य कोस्तुकास्पद आहे. फिजिओथेरपी द्वारे लकवा,मान, पाठदुखी पासून मुक्त झालेल्या रुग्णांनी मनोगत व्यक्त केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed