वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील भामटेगिरी थांबवा – गौर सेनेची मागणी

0
वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील भामटेगिरी थांबवा - गौर सेनेची मागणी

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील भामटेगिरी थांबवा - गौर सेनेची मागणीवैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील भामटेगिरी थांबवा - गौर सेनेची मागणी

उदगीर (प्रतिनिधी) : वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस, बीडीएस, बी ए एम एस, बी यु एम एस, बी पी टी या विविध वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. या प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीचे अवलोकन केले असता एकूण 246 बोगस राजपूत भामटा आणि 66 बोगस छप्परबंद विद्यार्थ्यांनी घुसखोरी केल्याचे निदर्शनास आले आहे. या लोकांमुळे मूळ विमुक्त भटक्या जाती जमातीवर अन्याय होत आहे. सवर्ण आणि बिगर मागास असणाऱ्या लोकांनी या प्रवर्गात घुसखोरी केली आहे. खऱ्या विमुक्त जाती प्रवर्गातील उमेदवारांना या भामटेगिरीमुळे वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रवेश मिळणे अशक्य झाले आहे, असा आरोप करत सोबत बोगस आणि घुसखोर विद्यार्थ्यांची यादी जोडून गौर सेनेच्या वतीने शासनाला निवेदन देण्यात आले आहे. तसेच अशा पद्धतीने लबाडी करून जात वैधता प्रमाणपत्र हस्तगत केली आहेत, त्यांची फेर तपासणी करणे आवश्यक आहे. ज्यामुळे खऱ्या लाभार्थी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. याची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन चौकशीअंती जे विद्यार्थी दोषी आढळतील त्यांचे प्रवेश रद्द करावेत आणि त्या जागेवर खऱ्या अर्थाने विमुक्त भटक्या जाती जमातीतील विद्यार्थ्यांना संधी द्यावी. विमुक्त भटक्या समाजातील 14 जातीवर अशा घुसखोरीमुळे अन्याय होत असल्याचे गौर सेनेने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदरील निवेदनावर जयपाल वैजनाथ राठोड, लक्ष्मण जाधव, सुनील किशन चव्हाण, सागर पांडुरंग राठोड, किरण रामराव पवार, किशोर पांडुरंग राठोड, अविनाश सुरेश चव्हाण, आतिश रमेश चव्हाण, सचिन वैजनाथ पवार, अजित रंगराव राठोड इत्यादी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed