देवणी नगरपंचायतीमध्ये राजकीय सत्ता परिवर्तनाचा गौप्यस्फोट!
देवणी (दयानंद स्वामी) : राजयोग नशिबी राहावा लागतो तेव्हाच राजटिलक माथी लागतो हा प्रारब्धचा भाग असला तरी राजकीय क्षेत्र असे क्षेत्र आहे की राजाचा रंक व रंकाचा राजा कधीही होऊ शकतो योगायोग असू शकतो भारतरत्न विश्व भूषण प पु डॉ.भीमराव रामजी आंबेडकरानी भारतीय राज्य घटनेच्या लिखित आरक्षणाप्रमाणे डॉ. कीर्तिताई घोरपडे या देवणी नगरीच्या नगराध्यक्षा झाल्या त्यांचा नगराध्यक्षा पदाचा कार्यकाळ संपण्याअगोदर सरकारने निर्णय घेऊन महाराष्ट्रातील नगराध्यक्षाचा कार्यकाल अडीच वर्षाच्या कालावधीला मुद्दत वाढ दिली अडीच वर्षानंतर आरक्षण निघून नगराध्यक्ष पदाचे स्वप्न पाहणाऱ्या नगरसेवकाच्या अशा अपेक्षावर अकक्षरशः पाणी फेरले आहे.
सविस्तर वृत्त असे की अडीच वर्षानंतर आरक्षणाप्रमाणे सत्ताचे स्वप्न पाहणाऱ्या लोकप्रतिनिधी नगरसेवकावर तेल ही गेलं तूप ही गेलं हाती… म्हणण्याची वेळ आली आहे नगर पंचायतमध्ये राजकीय गौप्यस्फोट घडवूनआनण्यासाठी विद्यमान नगरसेवक यांनी शेता शेतावर गुप्त बैठका घेऊन राजकीय खलबते शिजवली जात असून सत्तापरिवर्तना साठी सर्वच नगरसेवक एक हाती सत्ता असलेले काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते मा मल्लिकार्जुन मानकरी सावकार यांच्याकडे साकडे घालणार आहेत अन्यथा सर्वच नगरसेवक नगराध्यक्षावर अविश्वास ठराव आणणार असल्याची चर्चा आहे परंतु देवणी नगरपंचायतीवर निवडून आलेल्या सर्वच काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकावर स्थानिक पक्षश्रेष्ठी म्हणून मल्लिकार्जुन मानकरी सावकार यांचा पगडा कायम असून एक हाती अमल आहे त्यामुळे देवणी नगर पंचायतीत सत्ता परिवर्तन होणार का डॉ. कीर्तीताई घोरपडे यांना पुन्हा एकदा अडीच वर्षाची नशिबाने मिळालेली संधी देऊन काँग्रेस पक्षाचा नगर पंचायतीचा कार्यकाळ पूर्ण करणार मल्लिकार्जुन मानकरी यांच्या हाती असल्याचे बोलले जात आहे.