सत्कार सहकार महर्षीचा, लातूरकरांच्या आवडत्या व्यक्तिमत्वाचा
देवणी (दयानंद स्वामी) माजी मंत्री, सहकार महर्षी. आदरणीय. दिलीपराव देशमुख साहेब यांना साखर उद्योगातील गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल वलांडी ता.देवणी येथे नागरी सत्कार करण्यात आला.
” द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्टिक असोसिएशन इंडिया ” यांचा अतिशय प्रतिष्ठतेचा मानला जाणारा ” साखर उद्योग गौरव पुरस्कार ” राज्याचे माजी मंत्री तथा विकासरत्न. विलासराव देशमुख सहकारी कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षि, आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांना प्रदान करण्यात आला आहे.ही लातूर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असून आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याने निलंगा मतदारसंघाचे कॉंग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते तथा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस. अशोकभैय्या शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्याकडून सन्मान करुन शुभकामना देण्यात आल्या
लातुर जिल्ह्याचे नुतन लोकप्रिय. खासदार. डॉं. शिवाजीराव काळगे साहेब यांचाही सत्कार मा.अशोकभैय्या पाटील निलंगेकर साहेब यांच्या प्रमुख विशेष उपस्थीतीत महाविकास आघाडी निलंगा विधानसभा कॉंग्रेस कमिटी, राष्ट्रवादी काँंग्रेस पार्टी व शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून करण्यात आला..
यावेळी निलंगा तालुका कॉंग्रेस कमिटी समवेत आजी-माजी आमदार, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते,बँकेचे सर्व संचालक मंडळ,विविध सेलचे फ्रँटल अध्यक्ष,महिला कार्यकारिणी,युवक पदाधिकारी,मोठया संख्येने उपस्थित होते.