पतीचा खुन करून प्रेत गोदावरी नदी पात्रात टाकले ; अहमदपूर पोलीसात पत्नीसह एका वर गुन्हा दाखल
अहमदपूर (गोविंद काळे) : शेती विक्रितुन आलेले पैसे मुलीच्या नावावर बॅंकेत टाकायचे नसुन अहमदपूरात प्रॉपर्टी घ्यायची या कारणावरून, तसेच मयत हा इतर एका व्यक्तीस घरी येण्याचा राग मनात धरून मयताची पत्नी व अन्य एका इसमाने दि ६ सप्टेंबर रोजी रात्री ११: ३० च्या सुमाराम हल्ली मु. थोडगा रोड अहमदपूर येथील राहत्या घरी पतीचा खुन करुन प्रेताचा पुरावा नष्ट करण्यासाठी पोत्यात बांधुन दुचाकी गाडीवर घेऊन जाऊन प्रेत नांदेड येथील वाजेगाव भागातील जुण्या पुलावरून गोदावरी नदी पात्रात टाकल्याची तक्रार मयताचा भाऊ नागनाथ गुरूनाथ नागवंशी रा गांधी चौक बसवकल्याण जि बिदर ( कर्नाटक ) यांनी अहमदपूर पोलीसात दिली असता पोलीसांनी दि १० सप्टेंबर रोजी रात्री मयताची पत्नी आणी एका इसमावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी अहमदपूर पोलिसात नागनाथ नागवंशी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की माझा भाऊ मोहन गुरुनाथ नागवंशी मयत यांचे अंदाजे २५ वर्षां पूर्वी अहमदपूर जिल्हा लातूर येथील स्वाती माणिकराव धडे यांच्याशी रिती रिवाजा प्रमाणे लग्न झाले होते माझ्या भावाला दोन मुली झाल्यानंतर आमच्या गावातील बसवकल्याण येथील आनंद धनुरे आणि आमच्या भावाची मैत्री झाली होती त्यामुळे तो आमचे घरी सतत ये जा करत असे त्यानंतर आनंद धनुरे व स्वाती नागवंशी ( भावजय ) यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाल्याचे परिवारातील सदस्यांना समजले असता स्वाती नागवंशी भाऊजय हीने भावाला घेऊन अहमदपूर मध्ये भाड्याने रूम घेऊन राहत होते आनंद धनुरे हा अधून मधून अहमदपूर येथील भावाच्या घरी जात असे भावाच्या आर्थिक व्यवहारात ढवळाढवळ करायचा असे मयत मोहनने गावाकडे आल्यावर आम्हास सांगितले सतत घरी येणे व्यवहारात ढवळाढवळ करणे मोहनला पटत नव्हते परंतु त्यास स्वातीचा पाठिंबा होता पुढे पुढे तर स्वाती आणि आनंद धनुरे हेच आर्थिक व्यवहार पाहत होते त्यानंतर स्वाती आणि आनंद धनुरे यांनी माझ्या भावास बसवकल्यांची जमीन विकून अहमदपूरला प्रॉपर्टी घ्यायची आहे असा तगादा लावला असता बसवकल्यांची एकत्रित भावंडाची जमीन विक्री करून हिस्याने पैसे वाटून घेतले हेच पैसे माझा भाऊ मोहन ( मयत ) यांच्या मते जे काही पैसे आले आहेत ते मुलीच्या नावावर टाकायचे होते आणि स्वातीला अहमदपूरत प्रॉपर्टी घ्यायची होती या कारणासह आनंद धनुरे घरी येण्यास भावाचा विरोध असल्यामुळेच स्वाती नागवंशी आणि आनंद धनुरे यांनी माझा भाऊ मोहन वय 58 वर्षे याचा दि ६ सप्टेंबर रोजी रात्री ११ : ०० सुमारास अहमदपूर येथील थोडगा रोड वरील राहत्या घरी खून केला व खुनाची माहिती कोणासही समजू नये म्हणून प्रेत पोत्यात बांधून मोटार सायकल वरून अहमदपूर येथून नांदेड येथे घेऊन जाऊन गोदावरी नदी वरील वाजेगाव भागातील जुन्या पुला वरून नदीच्या पात्रात फेकून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
दि ९ सप्टेंबर रोजी अहमदपूर पोलिसांनी आम्हास फोन करून सांगितले की वांगी शिवारात गोदावरी नदी पात्रात एका पुरुष जातीचे प्रेत मिळून आले आहे ते तुमच्या भावाचे आहे का ते आम्हास पाहून सांगा असे कळवले तेव्हा मी माझा पुतण्या नांदेडला थांबलेला विशाल नागवंशी यास सांगितले त्यावेळेस पुतण्या विशालने वांगी येथी नदी पात्रात जाऊन प्रेताची पाहणी करून सदर प्रेत मोहन माझा भाऊ याचेच असल्याचे सांगितले त्यावरून पोलिसांनी पंचनामा करून नांदेड येथील शासकीय रुग्णालयात प्रेतावर शवविच्छेदन करून मोहनचे प्रेत आमच्या ताब्यात दिले आम्ही प्रेतावर अंत्यविधी करून दि १० सप्टेंबर रोजी अहमदपूर पोलिसात तक्रार दिली.
सदरील तक्रारी वरून अहमदपूर पोलीस ठाण्यात स्वाती मोहन नागवंशी ( पत्नी ) व आनंद धनुरे रा. बसवकल्याण जि बिदर (कर्नाटक ) ह. मु थोडगा रोड अहमदपूर यांचे विरुद्ध गुरन नं ०५४२ / २४ कलम भारतीय न्याय संहिता बीएनएस २०२३ १०३ ( १ ) , २३८, ३ ( ५ ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अहमदपूर पोलीस करीत आहेत.