उदगीर मनसेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
उदगीर (प्रतिनिधी) : आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने उदगीर विधानसभा निवडणूक ताकतीने लढण्याचे निश्चित असल्याने त्याच अनुषंगाने संघटनात्मक बांधणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने उदगीर विधानसभेतील नव नियुक्त्या जाहीर करण्यात येत आहे नुकत्याच झालेल्या बैठकीत संतोष भाऊ नागरगोजे प्रदेश सरचिटणीस व बाळा शेंडगे पक्ष निरीक्षक यांच्या सूचनेवरून जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या असून मनसे वाहतूक सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी राजकुमार गायकवाड,शहर उपाध्यक्षपदी रामेश्वर बनशेळकीकर,शहर उपाध्यक्ष केदार पुराणीक यांची नियुक्ती नियुक्तीपत्र देऊन जाहीर करण्यात आली. राज ठाकरे ठाकरे यांचे विचार उदगीर विधानसभेतील घराघरापर्यंत पोहोचण्याच्या कामी तसेच सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या हातून भरीव कामी व्हावे तसेच आपल्या कार्यक्षेत्रात पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने सुद्धा भरीव कामगिरी व्हावी. ही अपेक्षा बाळगत पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी उदगीर तालुकाध्यक्ष संग्राम रोडगे, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष बापू जाधव, दत्ता कारलेवाड ,विनोद चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.