गौरी व गणपती सजावटीसाठी विद्यार्थ्यांनी केली इकोफ्रेंडली पर्यावरणपूरक सजावट
(यशवंत विद्यालयात मिळाले विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण)
अहमदपूर (गोविंद काळे) : यशवंत विद्यालय अहमदपूर येथे विद्यार्थ्यांना आनंददायी शनिवार या उपक्रमात कार्यानुभव विषयाचे रंगीत पेपरच्या साह्याने विविध शोभिवंत वस्तूंची निर्मितीसाठी मार्गदर्शन करण्यात आले.यातून तयार झालेली शोभनिय वस्तूंचे गणपती व गौरी सजावटीत वापर करण्यात आला.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, मूल्यसंसस्कार किंवा आनंद हा केवळ पाठ्यपुस्तके वाचून निर्माण होत नाही. तर ती कृतीमधून,अनुभवांतून, खेळांतून,कलेतून,पर्यटनांतून, प्रात्यक्षिकांतून,स्वनिर्मितीमधून आणि बौद्धिक खेळांतून हे साधता येते. यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शालेय आनंददायी शनिवार ‘दप्तराविना शाळा’ हा विचार मांडला गेला.
म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यात २०२४- २०२५ या शैक्षणिक वर्षापासून ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम सुरू झाला आहे.
इको फ्रेंडली डेकोरेशन करताना थर्माकॉलचा वापर करायचा नाही.थर्माकॉल किंवा इतर अर्नेसर्गिक किंवा प्लास्टिकचा वापर टाळावेत. रंगीत कागदाचा उपयोग करुन अनेक प्रकारांची व आकारांची घरे,फुले,विविध खेळणी,चक्रे, वालपीस,फळे,तोरण इ. विद्यार्थ्यांनी सुबक पद्धतीने विद्यार्थ्यांनी कलाकृती तयार केले.व तीच इकोफ्रेंडली कलाकृती गौरी व गणपती सजावटीसाठी वापर केले.यातून
कागद न कापता केवळ त्याला विविध घडया मारुन त्यांतून अनेक आकारांच्या कलाकृती साकारले यातूनच ‘ओरिगामी’ कलेचा अभ्यास झाला.
या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना रंगीत कागद कला शिक्षक महादेव खळुरे यांनी पुरवठा करुन देवून योग्य ते मार्गदर्शन केले.गौरींच्या सजावटीसाठी विद्यार्थ्यांनी रंगबिरंगी कागदांचा वापर करून कागदांपासून लहान मोठे असे विविध आकाराचे डिझाईनचे फुले बनवली.काहीही तोरणे तर काही रंगीत कोलाकार चक्र,विविध कलाकृतीतून आनंददायी शिक्षण घेण्याचा मनमुराद आनंद लुटला गेला.
वरील उपक्रमाबद्दल संस्थेचे सचिव डी.बी.लोहारे गुरुजी,अध्यक्ष डाँ अशोकराव सांगविकर,उपाध्यक्ष डाँ भालचंद्र पैके,उपसचिव डाँ सुनिताताई चवळे,मुख्याध्यापक गजानन शिंदे,उप मुख्याध्यापक माधव वाघमारे,पर्यवेक्षक रामलिंग तत्तापुरे, शिवाजी सूर्यवंशी आदिनी कौतुक केले.