महेश अर्बन को-ऑप बँकेच्या लातूर विभागीय कार्यालयाच्या विस्तारित वास्तुचे भूमीपूजन
लातूर : महेश अर्बन को-ऑप बँक आहमदपूरच्या लातूर विभागीय कार्यालयाच्या मुख्य इमारती जवळ नवीन विस्तारीत वास्तुचा भूमीपूजन समारंभ बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते व बँकेचे ज्येष्ठ संचालक आमदार बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (ता. 12) रोजी कामदार रोड येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
महेश अर्बन को. ऑप बँकेच्या लातूर येथील विभागीय कार्यालय व मुख्य शाखेच्या सुसज्ज इमारती लगत कामदार रोड, लातूर परिसरात या वास्तूचा विस्तार करण्यात येणार असून या कामाचे भूमीपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमास डी.एन. शेळके, सुनिल पडिले, ज्ञानोबा पिनाटे, अॅड. मंगेश महींद्रकर, गंगाधर कासले, संचालक अॅड. विनायक भोसले, शिवानंद हेंगणे, सतीशराव कल्याणी, पुरुषोत्तम पुरोहित, अॅड. सादीक शेख, अक्षय धुत्त, व्यवंस्थापक प्रशांत मांंडवकर, बालासाहेब जाधव तसेच बँकेचे अधिकारी, कर्मचारी, ग्राहक, ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन सहा. व्यवस्थापक एस.एस. रंदाळे यांनी केले.