इंजि. विश्वजीत गायकवाड फाउंडेशन मार्फत व्यायामाचे साहित्य आणि स्पर्धा परीक्षांचे पुस्तके वाटप

0
इंजि. विश्वजीत गायकवाड फाउंडेशन मार्फत व्यायामाचे साहित्य आणि स्पर्धा परीक्षांचे पुस्तके वाटप

इंजि. विश्वजीत गायकवाड फाउंडेशन मार्फत व्यायामाचे साहित्य आणि स्पर्धा परीक्षांचे पुस्तके वाटप

उदगीर (प्रतिनिधी) : इंजिनीयर विश्वजीत अनिलकुमार गायकवाड फाउंडेशनच्या मार्फत तरुणांच्या आरोग्य आणि विचार संवर्धनाचा संकल्प करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागातील तरुणांसाठी वैचारिक साहित्याचा आस्वाद आणि व्यायामासाठी आवश्यक साधनांची कमतरता पाहून इंजि. विश्वजीत गायकवाड यांनी आपल्या फाउंडेशनच्या वतीने ग्रामीण भागातील तरुणांसाठी स्पर्धा परीक्षेला उपयुक्त ठरतील असे पुस्तके आणि व्यायामासाठी आवश्यक असलेले साहित्य वाटप करण्याचा शुभारंभ अवलकोंडा येथून केला आहे. ग्रामीण भागातील तरुणांना ऐतिहासिक पुरुषांचे चरित्र माहित व्हावे, वैचारिक प्रगल्भता लाभावी, तसेच सुदृढ शरीरामध्ये सुदृढ मन राहते. मानसिक सामर्थ वाढते. या दृष्टीने व्यायामाचे साहित्यही वाटप करण्याचा शुभारंभ करण्यात आला आहे. याप्रसंगी फाउंडेशनच्या वतीने धनंजय कीर लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा तसेच इतर प्रेरणादायी पुस्तके क्रांतीसुर्य महात्मा बसवेश्वर, महात्मा ज्योतिबा फुले, श्रीमान योगी, लोकराजा शाहू छत्रपती, राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, राजश्री छत्रपती शाहू महाराज या पुस्तकासह पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, तलाठी भरती, बँक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक पुस्तके देण्यात आली आहेत. तरुणांनी आपले ज्ञान वाढवावे आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. आरोग्य चांगले राहावे यासाठी व्यायाम करावा, आणि वैचारिक प्रगल्भता निर्माण करण्यासाठी वाचन संस्कृतीचे जतन करावे. या वाचन संस्कृतीची प्रेरणा निर्माण व्हावी यासाठी वैचारिकतेने समृद्ध असलेली पुस्तके आपल्याला उपलब्ध करून देण्यात येत आहेत. महापुरुषांचे चरित्र वाचून आपले चारित्र्य घडू शकते, तर व्यायामाच्या साहित्यामुळे आरोग्य चांगले ठेवून स्पर्धा परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाता येते. यासाठी ग्रामीण भागातील तरुणांनी पुस्तके वाचनाकडे विशेष लक्ष द्यावे, असेही आवाहन याप्रसंगी इंजि. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड फाउंडेशनचे अध्यक्ष विश्वजीत गायकवाड यांनी केले आहे. याप्रसंगी आवलकोंडा गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *