गंजगोलाईतील दुकान मालकांनी केलेले अतिक्रमण काढावे जनहित युवा संघटनेने मनपा आयुक्तांना दिले निवेदन
गंजगोलाई बाजारपेठेतील रोडवर केलेले अतिक्रमण काढून नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे – बाबासाहेब बनसोडे.
लातूर (प्रतिनिधी) : लातूर येथील नावाजलेल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या विविधतेने नटलेल्या 16 रस्त्यांना जोडणारा प्रसिद्ध बाजारपेठ म्हणजे गंजगोलाई या सर्व विविध 16 रस्त्यांना जोडणारे रोड मेन रोड, कापड लाईन, भुसार लाईन, चुरमुरे मसाला लाईन, मस्जिद रोड, भाजी मार्केट, नांदेड रोड, नावंदर मार्ग, नवयुग टाकी मार्ग, शिवाजी महाराज मार्ग, सोनार लाईन, लोखंड लाईन मार्गावरील व्यापारी दुकानदाराने दुकाना व्यतिरिक्त समोर फुटपाथवर, रोडवर व्यापाऱ्यांनी टेबल व इतर साहित्य ठेऊन केलेल्या अतिक्रमणामुळे ग्राहकांना, महिला, नागरिकांना, पादचा-र्यांना, वाहन चालकांना रहदारी करतांना मोठी कसरत करावी लागत असून जाण्यासाठी मज्जाव करीत अतिक्रमण करून अर्धा रोड चक्क दुकानदारीने बंद करून रहदारीस अडथळा निर्माण करीत आहेत यामुळे नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागत असल्याने आज शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी लातूर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरेसह सी झोन क्षेत्रीय अधिकारी पवन सुरवसे यांना दुकानासमोरील रोडवर केलेल्या रस्त्यावर जाण्या येण्यासाठी अडथळा निर्माण होत असलेले अतिक्रमण तात्काळ काढावे व गंजगोलाईतील रस्त्यांनाही मोकळा श्वास द्यावा म्हणून जनहित युवा संघटनेने आज निवेदन देत आयुक्तांशी चर्चा केली.
याप्रसंगी जनहित युवा संघटनेने दिलेल्या निवेदनावर अतिक्रमण तात्काळ न हटवल्यास येणाऱ्या पुढील काळात लोकशाही पद्धतीने मोठे आंदोलन करणार असल्याचेही यावेळी आयुक्तांशी चर्चा करताना सांगितले.
यावेळी जनहित युवा संघटना महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, जनहित युवा संघटना महाराष्ट्र राज्य मराठवाडा अध्यक्ष दीपक गंगणे, सामाजिक कार्यकर्ते हातिम भाई शेख,नितीन चालक आदींसह इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.