एकसंध राष्ट्र निर्मितीमध्ये हिंदीचे मोठे योगदान – डॉ. राजकुमार जाधव

0
एकसंध राष्ट्र निर्मितीमध्ये हिंदीचे मोठे योगदान - डॉ. राजकुमार जाधव

एकसंध राष्ट्र निर्मितीमध्ये हिंदीचे मोठे योगदान - डॉ. राजकुमार जाधव

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतासारख्या विविधतेने नटलेल्या, विस्तीर्ण भूभागावर पसरलेल्या देशाला एकत्र ठेवण्यात, एकसंध राष्ट्र निर्मितीच्या कार्यात हिंदीचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन ढोकी येथील वसंतराव काळे महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ. राजकुमार जाधव यांनी केले.
येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या ‘हिंदी दिवस समारोह’ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते, तर किसान विचारपीठावर उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, हिंदी विभाग प्रमुख डॉ.नागराज मुळे, सहयोगी प्राध्यापक डॉ. पांडुरंग चिलगर यांची प्रमुख उपस्थित होती.
यावेळी पुढे बोलताना डॉ. जाधव म्हणाले की हिंदी ही भारतातील रोजगाराची प्रमुख भाषा असून, जगात सर्वत्र हिंदीचा अभ्यास सुरू आहे. पत्रकारितेबरोबरच, बँक, पर्यटन प्रसारमाध्यमे अशा विविध क्षेत्रात हिंदीतून रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, हिंदी ही सर्वांना आवडणारी जिंदादिल भाषा असून, ती प्रत्येकाच्या दिलाची धडकन आहे. ती खऱ्या अर्थाने जनमानसाची भाषा असून, हिंदीच्या विकासासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत असेही ते म्हणाले.
यावेळी हिंदी विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘प्रयास’ आणि क्रीडा विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘ ध्यानचंद’ या भित्तीपत्रकांचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ऐश्वर्या बोडके, शिवकन्या सुरनर आणि वैष्णवी मंडले या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख डॉ. नागराज मुळे यांनी केले, तर डॉ. पांडुरंग चिलगर यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *