बलात्कार प्रकरणात आरोपी नराधाम पित्यास 10 वर्षाची सक्त मजूरीची शिक्षा व 20,000 रु दंड
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील शिरुर ताजबंद शिव छत्रपती नगर येथील एका नराधाम पित्याने साधारणतहा: वर्षभरापुर्वी इ.स 2023 मध्ये आपल्याच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता या प्रकरणी अहमदपूर पोलीसांनी गुन्हा दाखल करून न्यायालयात आरोप पत्र दाखल करण्यात आले होते सदरील प्रकरणाची न्यायालयात सुणावणी होऊन आरोपी वरील आरोप सिद्ध झाल्यामुळे सुरेंद्र वडगावकर विशेष जिल्हा व सत्र न्यायाधिश-1 यांनी दोषी आरोपी नराधाम पित्यास 10 वर्षे सक्त मजूरीची शिक्षा व 2OOOO हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे
याविषयी सदरील गुन्ह्याच्या निकाला विषयी अहमदपूर न्यायालयाचे सरकारी वकील यांनी दिलेल्या माहीती वरून साधारणतहा: वर्षभरापुर्वी इ.सन 2023 रोजी आरोपी नराधाम पिता हा अल्पवयीन पिडीत मुलीचे वडील असुन त्याच्या स्वताच्या राहत्या घरी पिडीत अल्पवयीन मुलीला सोबत घेवून रघ पांघरून झोपलेला होता त्यावेळी पिडीत मुलीच्या आईने पिडीत मुलीला आरोपी पती सोबत झोपलेले पाहीले. व पीडीत मुलीस हाताला धरून उठवण्याचा प्रयत्न केला असता आरोपी अल्पवयीन मुलीचे नराधाम वडील पिडीत मुलीला ओढून धरत होता. पांघरनातुन बाहेर येवू देत नव्हता. त्यावेळी पिडीत मुलीच्या आईने रघ ओढून काढली असता आरोपी नग्न अवस्थेत होता तसेच पिडीत मुलीची सलवार खाली काढलेली होती. पिढीत मुलगी आईला पाहून रडत होती त्यानंतर आरोपी पतीने पत्नीस मारहाण केल्यानंतर बाहेर निघून गेला.
त्यानंतर पिडीत मुलीच्या आईने मुलीस घडलेला प्रकार विचारला असता मुलीने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला असता पिडीत अल्पवयीन मुलीवर अत्याच्यार केलेल्या नराधाम पित्यास पकडून अहमदपूर पोलीस स्टेशन येथे घेवून आले व आरोपी विरुध्द पिडीताचे वडीलाने केलेल्या कृत्याबाबत सविस्तर तकार देण्यात आली व पोलीस स्टेशन अहमदपूर येथे सदर गुन्हयाचे विरुध्द इ.सन 2023 मध्ये फिर्याद दाखल केली. सदरील फिर्यादी वरुन गु.र.क. 193/2023 गुन्हा कलम 376(2) (फ), भा.दं.वि. व गुन्हा कलम 4, 6, 8 बाल लैंगीक अत्याचार संरक्षण कायदा कायदान्वये नोंद करुन तपासिक अधिकारी निकेतन कदम यांनी योग्य तपास करुन अहमदपूर न्यायालयात वरील कलमान्वये दोषारोप पत्र दाखल केले.
सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण 06 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली.उपविभागीय पोलीस अधिकारी निकेतन कदम यांना सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक नरसिंग नरहरे, पोना गुट्टे धर्मपाल , पोना संजय कराड यांनी तपासात मदत केली तसेच पोह कैलास चौधरी यांनी प्राथमिक तपासात मदत केली होती अतिरिक्त सत्र न्यायालयाचे समन्स वारंट व सर्व साक्षीदार या सर्वांना वेळेवर पोना आर.एस राजगीरवाड यांनी हजर केले
त्यामध्ये पिडीत मुलगी, व पिडीतेची आई, वैदयकीय अधिकारी व तपासिक अधिकारी निकेतन कदम यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधिश अहमदपूर सुरेंद्र वडगावकर यांनी प्रकरणाच्या सुनावणी अंती सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आलेला पुरावा ग्राहय धरुन आरोपी नराधाम पित्यास बाल लैंगीक अत्याचार संरक्षण कायदा चे कलम 06 सह कलम 18 खाली 10 वर्षाची सक्त मजूरीची शिक्षा सुनावली. तसेच 20.000/ रुपये दंड आकारण्यात आला व दंड न भरल्यास पून्हा 01 वर्षाची साधी कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे
तसेच दंडाची रक्कम पिडीतेला देण्यात यावी असा आदेश न्यायालयाने दिला पिडीतेला नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा विधिसेवा प्राधिकरण लातुर यास शिफारस केली आहे या खटल्यामध्ये सरकार तर्फे विषेश सहायक सरकारी वकील महेश पाटील यांनी काम पाहीले जिल्हा सरकारी वकील संतोष देशपांडे यांनी मार्गदर्शन केले.