कला माणसाला आनंद देते – रवी राय

0
कला माणसाला आनंद देते - रवी राय

कला माणसाला आनंद देते - रवी राय

उदगीर (प्रतिनिधी) : प्रचंड गरिबी व प्रतिकूल परिस्थितीतूनही मी कलेच्या माध्यमातून रोजगाराबरोबरच आनंद मिळवतो. कारण कला ही नेहमी जीवनाला आनंद देत असते, असे मत राजस्थान येथील कलावंत रवी राय यांनी व्यक्त केले. श्री हावगीस्वामी महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षच्यावतीने टाकाऊ पासून टिकाऊ या विषयावर मार्गदर्शन व प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.ए.ए.काळगापुरे तर मंचावर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.विठ्ठल गोरे उपस्थित होते. आपण अनेक गोष्टी टाकून देत असतो.परंतु कल्पकतेने विचार केल्यास त्यापासून वस्तू बनविता येतात. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनही याचा विचार आपण करायला हवा.असे प्रास्ताविकात डॉ. विठ्ठल गोरे यांनी सांगितले.

पुढे बोलताना रवी राय म्हणाले, राजस्थानमध्ये सतत दुष्काळ असतो. त्यामुळे आमचे लोक कलेच्या आधारे जीवन जगत असतात. मी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त नसलो, तरी या कलेच्या माध्यमातून स्वाभिमानाने जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असतो. असे सांगत विविध कागदापासून वेगवेगळ्या घरगुती व उत्सवासाठी वस्तू कशा बनवल्या जातात,याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना त्यांनी दाखविले. अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य डॉ.ए.ए.काळगापुरे म्हणाले , विद्यार्थ्यांमध्ये अनेक सुप्त गुण असतात. त्या गुणांना वाव मिळाला तसेच प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे.अशा कार्यक्रमातून आपणास प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे सांगितले. कार्यक्रमास प्रा.डॉ.के.जी. कुंभारकर, डॉ.दयानंद धावणे, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राम राठोड, राजू उप्परबावडे व धनराज हुसाळे आदींनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन डॉ.म.ई.तंगावार तर आभार डॉ.रोहिदास राठोड यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *