वृक्षारोपण काळाची गरज – संगमेश्वर नंदगावे
उदगीर (प्रतिनिधी) : वृक्षारोपण ही एक सामाजिक चळवळ बनली पाहिजे. त्यादृष्टीने युवकांनी पुढे यावे, वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन युवा नेते संगमेश्वर नंदगावे यांनी केले. ते उदगीर तालुक्यातील चांदेगाव येथील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण करताना बोलत होते. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य गजानन तात्या तोंडारे, हरिश्चंद्र तोंडारे, गणेश तोंडारे, ग्रंथपाल कालिदास शिरसे, शिवकुमार डावळे, विजयकुमार नंदगावे, सुभाष तोंडारे, चंद्रकांत मिरकले ,भीमराव नंदगावे, सोपान देवनाळे, मनमत आप्पा इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
स्मशानभूमी मध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून स्मशानभूमीचे सौंदर्य वाढवण्यासोबतच अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना थांबण्यासाठी सोय व्हावी, सावली व्हावी. या उद्देशाने ठीक ठिकाणी वृक्षारोपण केले जावे. अशी अपेक्षाही संगमेश्वर नंदगावे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन कालिदास शिरसे यांनी केले.