आनंदी जीवन जगण्यासाठी वर्तमान काळात जगा – कैलास पाटील

0
आनंदी जीवन जगण्यासाठी वर्तमान काळात जगा - कैलास पाटील

आनंदी जीवन जगण्यासाठी वर्तमान काळात जगा - कैलास पाटील

साकोळ (प्रतिनिधी) : आनंद हा वर्तमानात असतो. परंतु मनुष्य नेहमी भूतकाळ किंवा भविष्यकाळात जगत असल्यामुळे हातातला वर्तमान क्षण निघून जात आहे. आणि त्यामुळे भूतकाळात पश्चाताप, त्रास याच्याशिवाय काहीच मिळत नाही. आणि भविष्यात गेल्यास चिंता याच्याशिवाय माणसाला काही मिळत नाही. त्यामुळे प्रत्येकाने वर्तमान क्षणात जगलं पाहिजे. आणि जीवनाचा आनंद उपभोगला पाहिजे असे प्रतिपादन कैलास पाटील यांनी केले.

साकोळ येथे आर्ट ऑफ लिविंग द्वारा हॅप्पीनेस कोर्सला दि 14 सप्टेंबर रोजी सुरुवात झाली आहे. या शिबिराचे दीप प्रज्वलन माधव बर्गे यांच्या हस्ते झाले. यावेळी कैलास पाटील, मनोज कुंभार, जिल्हा परीषद चे माजी सभापती गोविंद चिलकुरे, कल्याणराव बरगे, मंगेश महाजन, आशिष धुमाळे, शिवराज बर्गे, विलास रामशेट्टे, शिवराज भुरे उपस्थित होते. पुढे बोलताना कैलास पाटील म्हणाले, आज धावपळीच्या जीवनात मनुष्य खूप चिंतेत आणि तणावपूर्ण जीवन जगत आहे. त्यामुळे मानवाला विविध आजाराचा सामना करावा लागत आहे. निरोगी व आनंदी जीवन जगण्यासाठी योगा, प्राणायाम, ध्यानधारणा केली पाहिजे. निसर्गाशी नाते जोडले पाहिजे वृक्ष लागवड करून ते वृक्ष जपले पाहिजेत. पाण्याचे संवर्धन केले पाहिजे असेही ते म्हणाले.

साकोळ येथे आर्ट ऑफ लिविंग च्या हॅप्पीनेस शिबिराची सुरुवात अतिशय उत्साहात झाली. या शिबिरात ६० जणानी आपला सहभाग नोंदवला. या शिबिराची सुरुवात 14 तारखेला झाले असून 19 तारखेला समारोप होणार आहे. संपूर्ण साकोळ आर्ट ऑफ लिविंगमय करू असा निर्धार माधवराव बर्गे, मनोज कुंभार यांच्यासह शिबिरातील प्रत्येकाने केला आहे. शिबीरातील सुदर्शन क्रिया, प्राणायाम , संवाद यामुळे प्रत्येक जण नवीन ऊर्जा अनुभवत आहे. यामुळे चित्त, वृत्ती, मनःशांती लाभत असल्यामुळे सर्वजण आनंदी दिसत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *