केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते बुधवारी औसा येथील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते बुधवारी औसा येथील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन
तक्षशिला बुद्ध विहार ध्यान धारणा केंद्राचेही होणार लोकार्पण
लातूर (प्रतिनिधी) : औसा शहरातील विविध विकास कामांचे लोकार्पण बुधवारी (दि. १८) केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते होणार आहे. औसा शहरातील विजय मंगल कार्यालयात दुपारी १२ वाजता हा समारंभ होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गिरीश महाजन राहतील.
कार्यक्रमाला राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण व गृहनिर्माण विभागाचे मंत्री अतुल सावे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खासदार शिवाजी काळगे, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार रमेश कराड, आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार अभिमन्यू पवार, आमदार धिरज विलासराव देशमुख यांची उपस्थिती राहणार आहे.औसा शहरातील तक्षशिला बुद्ध विहार ध्यान धारणा केंद्राचे यावेळी लोकार्पण होईल. तसेच भव्य प्रवेशद्वार, संरक्षण भिंत, उद्यान विकास व विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन होणार आहे.
किल्लारी येथे विविध कल्याणकारी योजनांचा जागर सोहळा
‘उत्कर्ष बहुजनांचा, संकल्प बहुजन कल्याणाचा’ या संकल्पनेतून विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा जागर सोहळा किल्लारी येथील शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे १८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटनही केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते व मंत्री, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत होणार आहे.