राजकारातील प्रस्थापितांच्या विरोधात मी विधानसभेला अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवणार – मा.जि.प सदस्य माधव जाधव

0
राजकारातील प्रस्थापितांच्या विरोधात मी विधानसभेला अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवणार - मा.जि.प सदस्य माधव जाधव

राजकारातील प्रस्थापितांच्या विरोधात मी विधानसभेला अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुक लढवणार - मा.जि.प सदस्य माधव जाधव

राष्ट्रवादी क्रॉग्रेस पक्षाला सोड चिठ्ठी देऊन विधान सभा निवडणुक लढवण्याचा निर्धार
अहमदपूर( गोविंद काळे ) आगामी काळात होणाऱ्या विधान सभेच्या निवडणूकीसाठी अहमदपूर चाकूर मतदार संघात एक आमुलाग्र बदल घडवण्याच्या उद्देशाने मतदार संघातील गेली अनेक वर्ष राजकारणातील प्रस्थापितांच्या विरोधात धर्मनिरपेक्ष राजकारण करून सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी राष्ट्रवादी क्रॉग्रेस पक्षाला (अजित पवार गट ) सोड चिठ्ठी देत असुन येणाऱ्या विधान निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणुन निवडणुक लढवण्याचा निर्धार माजी जि.प सदस्य माधव जाधव यांनी दि १७ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन केला यावेळी त्यांचे मोठे बंधु माणिकराव जाधव त्यांच्या सोबत पत्रकार परिषदेत उपस्थित होते
पुढे बोलताना माधव जाधव म्हणाले की, आमचे कुटुंब पुर्वी हैद्राबाद येथे राहत होते आम्ही अत्यंत हालाखीच्या परिस्थित जिवन जगले असुन माझे आई वडील तर विट भट्टीवर मोल मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत मि देखील अहमदपूर येथील डॉ सांगवीकर यांच्या हॉस्पीटल मध्ये तीनशे रूपयांच्या महीनेवारीवर कम्पॉडर म्हणुन काम केले आहे मी इ.सन २०१७ मध्ये सन्मानिय शरदचंद्र पवार साहेब यांच्या मुळ राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षातुन जि.प मतदार संघ खंडाळीतुन निवडणुक लढवुन जिंकुन येऊन पाच वर्षे माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेचे प्रश्न जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन मांडून प्रामाणिक पणे ते सोडवण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगीतले
बारा बलुतेदार आठरा पगड जातीतील लोकांना त्यांचे प्रश्न एैरणीवर घेऊन ते सोडवण्यासाठी त्यांचा आवाज शासनापर्यंत पोहचवण्यासाठी सर्व सामान्य धर्मनिरपेक्ष लोकप्रतिनिधिची गरज असुन जनतेनेच मला प्रस्थापितांच्या विरोधात उभे राहण्यासाठी ताकत दिली असुन निवडूण देण्याचे ठरवले आहे मी पुरोगामी विचाराचा वारसा घेऊन जनतेसाठी उभा राहणार आहे

       जनसामान्यांनातला आमदार कसा असतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे सर्वांना परिचित असणारे स्वर्गीय गणपतराव देशमुख व आपल्या मतदार संघातील  ऍड.रामचंद्रराव पाटील, स्वर्गीय भगवानराव नागरगोजे(अण्णा)  माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्या आदर्श विचाराचा वारसा माझ्या समोर असून सर्व सामान्याचा लोकप्रतिनिधी कसा असावा हे या लोकप्रतिनिधीनी दाखवून दिले होते. त्याचाच विचार  घेऊन मतदार संघातील राहिलेले कामे पूर्ण करणार असून माझा कोणीही प्रतिस्पर्धी नसून मी कोणाला पाढण्यासाठी किवा कोणाला विजयी करण्यासाठी उभा नसून मी पुरोगामी जनतेचा व सर्व सामान्य जनतेचा लोकप्रतिनिधी  म्हणून विजयी झाल्यास कार्य करणार आहे.

         माझे  जाधव परिवारासोबतचे संबध पूर्वी होते तसेच कायम राहणार असून ते पूढे ही कायम राहातील. विधान सभेला उभा राहाण्याचा निर्णय मी स्वता घेतला नसून तो प्रस्थापित्यांच्या विरुध्द मतदार संघातील सामान्या तल्या सामान्य जनतेने हा निर्णय घेण्यास भाग पाडले आहे. मी निवडून आल्यानंतर पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन चालणाऱ्या पक्षासोबतच काम करणार आहे.

        मला कोणावर टिका करायची नाही, माझ्यावर सोशल मिडिया मधुन माझ्यावर काहीजन वैयक्तिक खालच्या दर्जाची टिका टिपनी करत आहेत. त्यांच्या टिकेला प्रतिउत्तर न देता जनता त्यांच्या टीकेला येण्याऱ्या विधान सभेत मताच्या रूपाने उत्तर देणार आहे.

       मी माझ्या आई वडिलांना देव मानतो माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगतो की कोणाच्या विरोधात नाही. छत्रपती शिवाजी महाराज डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर यांचा  वारसा घेऊन पुढे आलोय  माधव जाधव हा माधवराव जाधव किंवा साहेब होणार नाही  सर्व सामान्यांना सहज उपलब्ध होणारा मी लोकप्रतिनिधी आसणार आहे.

        माझा सगळ्यात मोठा आधार माझे आई वडील माझा पाठीराखा भाऊ. मला निवडून आणायला असंख्य हात  आहेत अहमदपूरची जनता सर्वसामान्याच्या पाठीमागे उभे राहाणार आहेत असेही ते शेवटी म्हणाले

माणिकराव जाधव

कोणताही निर्णय घरापासून ते जनतेच्या मनातला असतो. प्रत्येक समाजाला आरक्षणासाठी भांडावे लागत आहे यांचे कारण बेरोजगारी,जनतेचे अनेक प्रश्न त्यांच्या हाताला काम नाही म्हणून जनतेचे प्रश्न शासनाने सोडवावेत, आम्ही कुठल्या पक्षाचा विचार करणार नाही. आम्ही अपक्ष म्हणून थांबणार आहेत. शरदचंद्र पवार साहेबांच्या माध्यमातुन तीकिट येणार नाहीच कारण आम्ही सामान्य आहोत, आम्ही अपक्ष म्हणून काम करणार आहोत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *