मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी गणेश विसर्जनाची आरती करण्याचा मान विश्वजीत गायकवाड यांना !
उदगीर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाचे युवा नेते तथा इंजि. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड फाउंडेशनचे अध्यक्ष विश्वजीत गायकवाड यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गणेश विसर्जनाच्या प्रसंगी आरती करण्याचा मान देण्यात आला. याप्रसंगी दस्तूर खुद्द मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, सौ. लता एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सौ. वृषाली श्रीकांत शिंदे, रुद्रांश श्रीकांत शिंदे तसेच श्री प्रभाकरजी काळे, सौ काळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव डॉ. नितीन राठोड, मंगेश चिवटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
युवा नेते विश्वजीत गायकवाड यांना हा बहुमान दिल्याबद्दल इंजि. विश्वजीत गायकवाड फाउंडेशन च्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे परिवाराचे ऋण व्यक्त करण्यात आले आहेत.