खेळांमुळे खेळाडूवृत्ती व संघभावना वाढते – राम ढगे

0
खेळांमुळे खेळाडूवृत्ती व संघभावना वाढते - राम ढगे

खेळांमुळे खेळाडूवृत्ती व संघभावना वाढते - राम ढगे

उदगीर (प्रतिनिधी) : खेळाच्या माध्यमातून खेळाडूवृत्ती तसेच संघभावना विकसित होते. आयुष्यात यशापयश पचविण्याचीही शक्ती खेळाच्या माध्यमातून आत्मसात करता येते,असे मत विद्यालयाचे विद्यार्थी प्रिय मुख्याध्यापक राम ढगे यांनी शाळेत संपन्न झालेल्या 17 वर्षे वयोगटातील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत तालुक्यात प्रथम आलेल्या खेळाडूंच्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.ही स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर द्वारा संपन्न झाली.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक राम ढगे यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव हिरागिर गिरी, कोषाध्यक्ष गुंडेराव पाटील, उपमुख्याध्यापक बी.बी नागरवाड,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप हणमंते, पर्यवेक्षक राजेंद्रकुमार वलाकटे, रूपाली बालूरे,सुनंदा मूर्कीकर, परीक्षा विभाग प्रमुख बाबासाहेब पाटील, कला शिक्षक एन.आर जवळे यांची यावेळी उपस्थिती होती.पुढे बोलताना राम ढगे म्हणाले की,मोबाईल व संगणक युगात युवा पिढी मैदानी खेळापासून दुरावली आहे.युवा पिढीला क्रीडा क्षेत्राशी जोडण्याच्या उद्देशाने शासन विविध खेळाच्या स्पर्धेचे आयोजन करत आहे.स्वामी विवेदानंद यांच्या सारखे तरुण – तरुणीने सुदृढ राहण्यासाठी खेळले पाहिजे व मंदिरापेक्षा मैदानात जावे,असा संदेश सत्कार कार्यक्रमाप्रसंगी दिला. या कार्यक्रमाप्रसंगी रुद्राणी राठोड, वैष्णवी पवार,अंकिता बिरादार, धनश्री जाधव, सायली नरुदे,गुंजन कांबळे, दुर्गेश्वरी स्वामी, सिद्धी वारंगकर, संघमित्रा मसुरे, अक्षरात देशट वार,दीक्षा मसुरे,पार्वती कदम, मयुरी पवार,शिवकृपा गवळी, संजीवनी भालेराव,आरती राठोड या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.के जाधव यांनी केले तर आभार अविनाश पो शेट्टी यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!