संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ अहमदपूरात आमरण उपोषणाला सुरुवात

0
संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ अहमदपूरात आमरण उपोषणाला सुरुवात

संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ अहमदपूरात आमरण उपोषणाला सुरुवात

अहमदपूर (गोविंद काळे) : मराठा संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे सहाव्यांदा अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अहमदपूर येथे जयराम पवार हंगरगेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
याविषयी माहिती अशी की, दि. २० रोजी सकल मराठा समाज अहमदपूर तर्फे तहसिलदार उज्वला पांगरकर व पोलिस निरीक्षक यांना आमरण उपोषणा संदर्भात उपोषण करण्यासाठी पूर्व परवानगी म्हणून एक निवेदन देण्यात आले होते.
मराठा आंदोलनाचे नेते संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, सगे-सोयरे लागू करावे, या मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु केले आहेत यांच्या समर्थनार्थ अहमदपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जयराम पवार हंगरगेकर यांनी आज दि. २१ रोजीच्या मध्यरात्री पासून उपोषणास सुरुवात केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलक सुरु आहे. मागच्या पाच दिवसांपासून जालन्यातील अंतरवली सराटीत ते उपोषण करत आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे. मंत्री शंभुराज देसाई आणि मराठा कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यानंतर मनोज जरांगेंनी काल रात्री सलाईन घेतली. त्यांच्या या आंदोलनाला मराठा समाजाने पाठिंबा दिला आहे. त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ उपोषण ला ठिकठिकाणी सुरुवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून अहमदपूर येथे ही उपोषण सुरुवात झाली असून मध्यरात्री पासून असंख्य सकल मराठा समाज बांधवांसह इतर समाज बांधवही जयराम पवार यांची भेट घेत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *