23 सप्टेंबर रोजी उदगीर बंद
उदगीर (प्रतिनिधी) : संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास जाहीर पाठिंबा देण्यासाठी दि.२३/०९/२०२४ वार सोमवार रोजी सकल मराठा समाज उदगीरतर्फे उदगीर बंदचे आवाहन केले आहे. या सदर्भात रीतसर निवेदन पोलीस निरीक्षक उदगीर शहर यांना देण्यात आले. गेल्या वर्षभरापासून चालू असलेल्या या लढ्याकडे सरकार मुद्दाम दुर्लक्ष करीत असून, मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या तात्काळ मंजूर करण्यात याव्यात यासाठी उदगीर बंदचे आवाहन करीत असल्याचे सकल मराठा समाज उदगीर तर्फे सांगण्यात आले. यावेळी शहर पोलीस स्टेशन उदगीर येथे निवेदन देण्याकरिता छावा संघटनेचे अध्यक्ष दत्ता पाटील, सतीश पाटील मानकीकर, बाळासाहेब पाटोदे , दीपक पाटील, अजित शिंदे, संदीप पाटील, सचिन पाटील, धर्मराज पाटील, बाळू शिंदे पाटील, बाबासाहेब पाटील, विवेक पंडितराव जाधव, राम रावणगावे, संग्राम पाटील, देविदास चिखले, अभंग जाधव, संजय कांबळे, अंकुश ताटपल्ले, अजित फुलारी, गोविंद बिरादार, , सुनील जाधव आदि समाजबांधव उपस्थित होते.