टायगर सेनामध्ये यूवकांचा प्रवेश
उदगीर (प्रतिनिधी) : टायगर सेना या संघटनेमध्ये दिवसेंदिवस यूवकांची संख्या वाढत चालली आहे. टायगर सेना ही सर्व सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत धडपड करत असते. उदगीर शहरात सय्यद चाँद दर्गा संपर्क कार्यालयात अनेक कार्यकर्त्यांनी टायगर सेना मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. तसेच संघटनात्मक बांधणीसाठी पदाधिकाऱ्यांची निवड ही करण्यात आली. टायगर सेना उदगीर शहर उपाध्यक्ष पदी सय्यद नूमान यांची निवड करण्यात आली असून यावेळी बोलताना मोहम्मद भाई जागीरदार म्हणाले देशहीत, समाजहीत यासाठी रात्रंदिवस आमचे कार्यालय खूले आहे, आपण जनतेचे हीत बघतो. अतिख भाई शेख म्हणाले येथे जात, धर्म -पंथ बाजूला ठेवून सर्व सामान्य गोरगरीब जनतेचा हक्क मिळवून देण्यासाठी टायगर सेना आहे, राष्ट्रीय महासचिव अजयभैय्या म्हणाले, टायगर सेना ही युवकांच्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी सेना असुन आपण आपल्या पदाचा गैरवापर न करता जनतेच्या कल्याणासाठी वापर करावा.प्रवक्ते वसीमभाई यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.यावेळी टायगर सेना संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष जॅकीदादा सावंत, राष्ट्रीय महासचिव अजयभैय्या सावंत, टायगर सेनेचे नेते मोहम्मदभाई जागिरदार, महाराष्ट्र उपाध्यक्ष आतिकभाई शेख, प्रवक्ते वसीमभाई बिद्री, शहर अध्यक्ष फाजीलभाई पठाण , ग्रामीण जिल्हा अध्यक्ष अभिमन्यू कांबळे, जिल्हा अध्यक्ष मनोज कांबळे व ईतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . या प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष मा. जॅकीदादा सावंत म्हणाले, टायगर सेना हे एक कुटुंब आहे व कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी तेवढीच आहे, जेवढी कुटूंब प्रमुखाची आहे. या कार्यासाठी आपण सर्वजण एकत्र मिळून लढायची ताकत ठेवली पाहिजे, सामाजिक व राजकीय वर्तुळात खळबळ उडवून आपले अस्तित्व दाखवून दिले पाहिजे.