काशीबाई पुणे यांचे दुखद निधन
अहमदपूर (प्रतिनिधि) : येथील वीरशैव लिंगायत भजनी मंडळाच्या सदस्या काशीबाई गुरुनाथ अप्पा पुणे यांचे वयाच्या 80 व्या वर्षी वृद्धापकाळाने दि 20 रोज शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता राहत्या घरी दुखद निधन झाले. दि. 21 रोज शनिवारी सकाळी 10.30 वाजता वीर शैव लिंगायत स्मशानभूमी मध्ये अत्यंत शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार असून दिलीप पुणे, विजय पुणे, चंद्रशेखर पुणे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या दुखद निधनामुळे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.