शहीद भगतसिंग प्रतिष्ठानच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन
अहमदपूर (गोविंद काळे) : शहीद भगतसिंग सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी अनंत चतुर्थी निमित्त श्री गणेश विर्सजनाच्या दिवशी शहरातील मेन रोड वर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसाद वितरणाच्या कार्यक्रमास मंजुषा लटपटे उपजिल्हाधिकारी अहमदपूर व मनिष कल्याणकर डी.वाय.एस.पी.अहमदपूर यांच्या हस्ते महाप्रसाद वितरण सुरू करण्यात आले
प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वीरप्पा भूसनुर नगरपरिषद प्रभारी मुख्याधिकारी सुंदर बोंडर , मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा विश्वंभर स्वामी आदींची उपस्थिती होती
यावेळी उपजिल्हाधिकारी मंजुषा लटपटे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी त्या म्हणाल्या की प्रतिष्ठानच्या वतीने आपण जो सामाजिक उपक्रम राबवत आहात तो याही पेक्षा अधिक चांगला होवो अशी सदिच्छा व्यक्त केली तसेच कल्याणकर यांनी मलाही प्रतिष्ठान मध्ये समाविष्ट करावे अशी भावना व्यक्त केली तसेच प्रा. विश्वंभर स्वामी यांनी प्रतिष्ठानचा खडतर प्रवास कसा होता व आज कसा आहे हे उपस्थित मान्यवरांना सांगितले
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रतिष्ठानचे पवन मुसळे,अरुणमामा चोले,रोहन बिराजदार,प्रशांत स्वामी,सचिन पाटील,परशुराम सुरनर,वैजनाथ होनराव,महालिंग पुणे,संतोष काडवदे,पंकज पांचाळ,आनंद पंडगे, प्रताप गवळी,प्रदीप काडवदे,सुधाकरभाऊ जाधव,वसंत शिंदे,भूषण कांबळे, भागवत सूर्यवंशी, आनंद कानडे, गोविंद गुडे, प्रताप बयास,रोहित टकटवळे,जगरूपभाऊ कराड,प्रशांत पांचाळ,डेनिम हब आदिंनी परिश्रम घेतले. यावेळी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी , सदस्य यांची उपस्थिती होती.