सोयाबीन काढण्यासाठी मजूर मिळेनात; एकरी ५ हजार रुपयांची मागणी

0
सोयाबीन काढण्यासाठी मजूर मिळेनात; एकरी ५ हजार रुपयांची मागणी

सोयाबीन काढण्यासाठी मजूर मिळेनात; एकरी ५ हजार रुपयांची मागणी

अहमदपूर तालुक्यात हजारो हेक्टरवर सोयाबीन पिकांची पेरणी

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीसह अनेक नैसर्गिक संकटाचा सामना करत सोयाबीन पिकाचा पेरा केला होता आता लवकरच १५ ते २० दिवसावर शेतकऱ्यांचे सोयाबीन पिक काढणीसाठी येऊन पोहोचले आहे. शेतातील सोयाबीनची काढणी वेळेवर होण्यासाठी, शेतकरी इकडे तिकडे मजुरांच्या शोधात फिरत असुन त्यांच्या दारात जाऊन उभा टाकला आहे. आता तर एक एकरला सरळ सरळ ५ हजार रुपयांची मजुरांकडणुन मागणी होत असल्याने, शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यासाठी मागील काही वर्षापासून नगदी पीक म्हणून सोयाबीनकडे वळला आहे. यंदा तर अतिवृष्टीसह अनेक संकटावर मात करत शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पीक काढण्यासाठी हातात आणले आहे.सोयाबीनला शेंगा लागल्या असताना, झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाला फटका बसला आहे. यावर्षी अहमदपूर तालुक्यात हजारो हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी झाली असल्याची माहीती कृषी विभागाकडून सांगण्यात आली आहे. निसर्गाचा असमतोल संभाळत शेतकयांनी सोयाबीन पिक काढणीसाठी हातात आणले आहे.
सध्या सप्टेंबर महीण्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असुन सोयाबीन पिक १५ ते २० दिवसाच्या आत कापणीसाठी येणार आहे. त्यामुळे वेळेवर मजुरांची तारा बंळ उडू नये यासाठी सोयाबीन उत्पादक शेतकरी मजूर वर्गाला सोयाबीन कापणीसाठी बोलताना दिसत आहेत. मजूर वर्गाकडून एकरी पाच ते साडेपाच हजार रुपये लागतील आत्ताच सौदा पक्का करा नाही तर तुम्ही तुमचे पाहून घ्या, असे सांगुन शेतकऱ्याऱ्यांची फजिती करताना दिसुन येत आहे . बहुतांश अनेक शेतकऱ्यांकडे शेती करण्यासाठी मनुष्यबळ नसल्या कारणाने नाईलाजास्तव पाच हजार रुपये एकराने सौदा पक्का करावा लागत आहे. तर काही शेतकऱ्यांनी जे होईल ते पाहून घेऊ. अशी भूमिका घेऊन विलंब झालातरी चालेल मात्र सोयाबीन घरीच कापणी करायची असा दृढ निश्चय केला आहे.
तालुक्यात मागील दोन ते तीन वर्षापासुन परतीच्या पाऊसाने धुमाकूळ घातला असल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात अपेक्षित उत्पादन निघाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. यावर्षी देखील शेतकन्यांनी आर्थिक बाबतीत मोठी तडजोड करीत खरिपाची पेरणी पूर्ण केली होती यंदातर जुनच्या सुरुवातीपासूनच सतत पडणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांच्या घात केला आहे. गतवर्षी ऐन सोयाबीन काढणीलाच परतीच्या पावसाने कहर केला होता शेतकऱ्यांचे हजारो हेक्टरवरील सोयाबीनचे पिक उद्धवस्त केले होते. चंदा तीच पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शेतकऱ्यांना भीती आहे. शिवाय परतीच्या पावसाच्या धास्तीनेच शेतकऱ्यांनी सोयाबीन कापणी वेळेत झाली पाहीजे यासाठी आत्तापासुनच लगबग सुरू केली आहे.

सोयाबिनचे गुळीच शिल्लक राहण्याची शक्यता

सोयाबिनचे पिक आता जवळ जवळ काढणीला आले असुन अगोदरच अतिवृष्टीमुळे सोयाबिन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे त्यातच शेतकऱ्यांच्या विषयी शासनाच्या उदासीन धोरणामुळे सोयाबिनचे पडलेले भाव आणि आता तर मजुर वर्गाकडून सोयाबिन काढण्यासाठी एकरी पाच ते साडेपाच हजार रूपयांची मागणी असल्यामुळे पेरणी पासुन काढणी पर्यतच्या खर्चाचा विचार केल्यास शेवटी सोयाबिनचे गुळी शिल्लक राहण्याची शक्यता आहे.
शेतकरी गोविंद काळे सुनेगाव (शेंद्री)

शेतकऱ्यांकडून हारवेस्टरचा शोध सुरू

शेतातील सोयाबिन काढण्यासाठी यावर्षी मजुरांनी एकरी पाच ते साडेपाच हजार रूपयांची मागणी करीत आहेत सोयाबिन काढल्यानंतर शेतात झाकुन ठेवणे, उंदरापासुन संरक्षण करणे ते मळणी यंत्रातुन काढण्यासाठी देखील खर्च आहे त्यापेक्षा हारवेस्टरच्या माध्यमातुन सोयाबिन काढल्यास मनुष्यबळ कमी लागते पैसा व वेळेची बचत देखील होते यासाठी शेतकऱ्यांकडून ठिक ठिकाणी हारवेस्टरचा शोध सुरु असल्याचे पाहवयास मिळत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *