सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी अहमदपूर बंदची हाक

0
सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी अहमदपूर बंदची हाक

सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी अहमदपूर बंदची हाक

अहमदपूर (गोविंद काळे) : मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे मराठा समाजाचा ओ.बी. सी. मध्ये समावेश करण्यासाठी आमरण उपोषणास अंतरवाली या ठिकाणी मागील सहा दिवस झाले बसले आहेत. त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी लातूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून उद्या दिनांक २३-९-२०२४ वार सोमवारी अहमदपूर शहरासह तालुका बंद पुकारण्यात येत आहे. सकाळी अहमदपूर शहरातून छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणाहून सकाळी १० वाजता शहरात सकल मराठा समाजाची बंद साठी हजारोच्या संख्येने शांततेत रॅली काढण्यात येणार आहे याची प्रशासनाने दखल घ्यावी अश्या आशयाचे निवेदन अहमदपूर सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस स्टेशन अहमदपूर येथे देण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *