मराठा आरक्षण आंदोलन; अहमदपूर शहर कडकडीत बंद
अहमदपूर (गोविंद काळे) : ओबीसीतुन मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी जरांगे पाटील सहाव्यंदा उपोषणाला बसले आहेत.उपोषणाचा सातवा दिवस असल्याने जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असून प्रशासन लक्ष देत नसल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने लातुर जिल्हा बंद चे आव्हान ता.२३ रोजी केले होते, या आवाहनाला प्रतिसाद देत अत्यावक्षक सेवा वगळता अहमदपूर येथील व्यापारी बांधवांनी शहरातील सर्व स्थापना बंद ठेऊन बंद ला प्रतिसाद दिला असल्यामुळे अहमदपूर शहर कडेकोट बंद होते.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचं औचित्य साधत मनोज जरांगे पाटील हे ता.१७ सप्टेंबर रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सहाव्यंदा आमरण उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या तीन प्रमुख मागण्या आहेत. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा, मराठ्यांच्या कुणबी नोंदींवरून सगेसोयऱ्यांनाही आरक्षण द्या आणि हैद्रराबादसह सातारा संस्थान आणि बॉम्बे गॅझेट लागू करा.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सात दिवस झाले असून उपोषणाच्या सातव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे मात्र सरकार लक्ष देत नसल्याने सकल मराठा समाज लातुर जिल्हा च्या वतीने ता.२३ बंद चे आवाहन केले होते या दृष्टीने ता.२२ रोजी अहमदपूर सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस प्रशासनाला ता. २३ बंद चे निवेदन दिले होते
सकाळी १० :oo वाजता शहरातील थोडगा रोड , कॉलेज रोड , मेन रोड , आझाद चौक , अंबेजोगाई रोड , सावरकर चौक मार्गावर सकल मराठा समाज बांधवांनी पदयात्रा काढून व्यापाऱ्यांना आप आपली आस्थापणे बंद ठेऊन सहकार्य करण्याची विनंती केली जय भवानी जय शिवाजी आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे मनोद दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणांनी परीसर दणानुन गेला होता पद यात्रे लहान मुलांनी सहभाग नोंदवून सगळ्यांचे लक्ष वेधुन घेतले होते शहरातील बहुतांश शाळा महाविद्यालये बंद होती
हात गाडे , फेरीवाले , भाजी विक्रेते , फळ विक्रेते यांच्यासह अत्यावक्षक सेवा वगळता स्थानिक व्यापारी बांधवांनी आस्थापना बंद ठेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळे अहमदपूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
शेवटी पदयात्रेची सांगता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जरांगे पाटील यांच्या समर्थनात आमरण उपोषणास बसलेले मराठा बांधव जयराम पवार यांच्या उपोषण स्थळी पदयात्रेचे सभेत रुपांतर होऊन आपल्या भावना व्यक्त करून सकल मराठा समाज बांधव अहमदपूर यांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली.