उदगीर येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करुन, पिकविमा कंपनीच्या प्रतिनिधींना त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश
उदगीर (एल.पी.उगीले) : तालुका कृषी अधिकारी नाबदे यांनी उदगीर तालुक्यातील भातखेडा येथे नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाची पाहणी करून पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना पंचनामे करण्याच्या आदेश दिले आहेत. नुकसानीची नोंद झाल्यावर १० दिवसाच्या आत विमा कंपनीने त्यांचे पंचनामे करणे अपेक्षित होते, तसे न झाल्यामुळे स्वतः तालुका कृषी अधिकारी आता शेतकऱ्यांच्या बांधावर उतरले असून, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासकीय मदत करताना दिसत आहेत.
भाकसखेडा गावचे चेअरमन विवेक पंडितराव जाधव यांनी दिलेल्या सूचनेनुसार पिकाची पाहणी करुन नुकसानीची नोंद करण्यात आली आहे.
यावेळी कृषी सहायक मोरे, उपसरपंच अरविंद मोरे, ग्रामसेवक पांचाळ, विमा कंपनीचे पाटील, माजी सरपंच श्रीहरी जाधव, विठ्ठलराव जाधव, लिंबाजी खेडकर, संतुकराव जाधव, रवि बुर्ले, दयानंद मोरे, सुनील जाधव, माधवराव टेकपुंजे, अशोक जाधव, धनाजी मोरे यांच्यासह सोयाबीन उत्पादक शेतकरी उपस्थित होते.