जया काबरा यांच्यामुळे पक्ष संघटन बांधणीला बळ मिळेल – दिलीपराव देशमुख (मालक)
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथील भारतीय जनता पक्षाच्या नेत्या तथा जिल्हा सरचिटणीस जया द्वारकादासजी काबरा यांची नुकतीच भारतीय नमो संघ महाराष्ट्र महिला प्रदेश महामंत्री पदी निवड झाल्याबद्दल भाजपच्या कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख (मालक) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. जया काबरा यांच्या एकूण कार्यपद्धतीमुळे भारतीय जनता पक्षाच्या कामकाजाला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आणि या निवडीबद्दल जया काबरा यांचा सत्कारही केला.
याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना जया काबरा म्हणाल्या की, पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर दाखवलेला विश्वास निश्चितच मी सार्थ करून दाखवेन आणि पक्ष संघटन बांधणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन. पक्षश्रेष्ठींला कुठेही मान खाली घालावी लागेल असे कृत माझ्या हातून कधीही होणार नाही. असा विश्वासही त्यांनी दाखवून दिला. आगामी निवडणुकांमध्ये त्याचा प्रत्येक येईल असेही त्या म्हणाल्या.