शास्त्री शाळेत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी
उदगीर (एल. पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात आज दिनांक २५सप्टेंबर २०२४ रोजी पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माधव केंद्रे व प्रमुख वक्ते म्हणून सौ. देवकबाई काळे उपस्थित होते.मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांची विशेष उपस्थिती होते.मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सौ. देवकबाई काळे यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.त्यांचा रेल्वे प्रवासातील प्रामाणिकपणाचा प्रसंग सांगितला.आपणही जीवनात प्रामाणिकपणे वागावे,असे सांगितले.
मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाने अनेक योजना चालू केलेल्या आहेत.त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपणही जीवनामध्ये प्रामाणिक राहावे.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात माधव केंद्रे यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. त्यांच्या अंगी प्रामाणिकपणा व राष्ट्रनिष्ठा हे महत्त्वाचे गुण होते. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आपणही त्यांच्यासारखे प्रामाणिक राहूया व राष्ट्रसेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचे आवाहन केले.
सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन मंजुषा पेन्सलवार यांनी केले.