लातूर पोलिसांची अवैध धंद्यावर कारवाई. 2 लाख 94 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त, 21 गुन्हे दाखल

0
लातूर पोलिसांची अवैध धंद्यावर कारवाई. 2 लाख 94 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त, 21 गुन्हे दाखल

लातूर पोलिसांची अवैध धंद्यावर कारवाई. 2 लाख 94 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त, 21 गुन्हे दाखल

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखू मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची ओरड होत होती. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने प्रतिबंधित गुटखा विक्रीला आळा घालावा या उद्देशाने मोहीम राबवली, आणि त्या मोहिमेमध्ये दोन लाख 94 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटका व सुगंधित तंबाखू जप्त केली आहे. या संदर्भात 21 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी संपूर्ण लातूर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेसह सर्व पोलिस ठाणे स्तरावर 44 पोलीस अधिकारी, 163 पोलीस अंमलदारांचे एकूण 25 पथके तयार करून महाराष्ट्र शासनाने विक्री,व्यवसाय साठी प्रतिबंधित केलेल्या गुटखा,पानमसाला ची विक्री करणाऱ्या दुकाने व पान टपऱ्यावर कारवाईची मोहीम राबविण्यात आली होती.
सदर मोहिमे अंतर्गत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य गुटखाची अवैध विक्री व्यवसाय करीत असलेल्या आस्थापनावर नमूद अधिकारी व अमलदारांच्या पथकाने छापेमारी करत महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेले वेगवेगळ्या कंपनीचे,महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले गुटका व सुगंधित पानमसाला असा एकूण 2 लाख 94 हजार 799 रुपयांचा प्रतिबंधित गुटका व सुगंधित पान मसाला तंबाखूचा मुद्देमाल मिळून आल्याने ते मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
संपूर्ण लातूर जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची अवैधरित्या साठवणूक करण्याचा संशय असलेले 17 मोठे गोडाऊन, तसेच ज्या इसमावर या अगोदर प्रतिबंधित गुटखा पान मसाला बाळगल्यावरून गुन्हे दाखल झालेले आहेत अशा इसमांचे राहते घर,आस्थापना तपासण्यात आले. सुगंधित पान मसाला व गुटख्याची विक्री करणाऱ्या 596 पान टपऱ्याची तपासणी करण्यात आली असून प्रतिबंधित गुटखा व पानमसाला मिळून आलेल्या इसमावर एकूण 21 गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सदरील गुन्ह्यांचा पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार करीत आहेत. अशी कारवाई यानंतरही सुरूच राहणार असून जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासन आणि कळवले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *