स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांनी मोबाईल पासून दूर राहावे – मुनव्वर मुजावर

0
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांनी मोबाईल पासून दूर राहावे - मुनव्वर मुजावर

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांनी मोबाईल पासून दूर राहावे - मुनव्वर मुजावर

अहमदपूर (गोविंद काळे) : सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेत यशस्वी साठी ग्रंथांसारखे विश्वासू साधन अन्य कोणतेच नसून, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी टीव्ही आणि मोबाईलपासून दूर राहावे, असे आवाहन येथील नायब तहसीलदार मुनव्वर मुजावर यांनी केले.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येथील महात्मा फुले महाविद्यालयातील महात्मा फुले सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा केंद्र उद्घाटन सोहळ्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शीघ्र कवी, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी होते, तर विचारपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार तुकाराम बनकर, डॉ. पांडुरंग चिलगर तसेच स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक डॉ. बब्रुवान मोरे, डॉ.सतीश ससाणे, डॉ. संतोष पाटील उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना मुनव्वर मुजावर म्हणाले की, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास हा जिद्द, चिकाटीने केला पाहिजे. तसेच मोठ्या संधीची वाट पाहत बसण्यापेक्षा, जी मिळेल ती संधी स्वीकारून पुढे गेले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातच स्पर्धा परीक्षेचा पाया पक्का करावा. महाविद्यालयात असलेल्या शिक्षकांकडून योग्य ते मार्गदर्शन घेऊन, ग्रंथांचे वाचन करावे आणि स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हावे असेही ते म्हणाले. यावेळी अर्थशास्त्र, संस्कृत आणि तत्त्वज्ञान या विषयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भितीपत्रकांचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याकार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ. बी. के. मोरे यांनी केले तर सूत्रसंचालन ह. भ. प. डॉ. अनिल मुंढे यांनी केले व आभार डॉ. सचिन गर्जे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!