मनोज जरांगे पाटील यांची मागणी रास्त, गरजवंत मराठा विद्यार्थ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे – स्वप्निल जाधव
उदगीर (प्रतिनिधी) : एकसंघ भारतातील सर्व समाज घटकांना प्रगतीची संधी उपलब्ध झाली पाहिजे. असा उदात्त्य हेतू ठेवून राज्यघटना लिहीत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणाचा विषय नमूद केला आहे. जे जे घटक कमजोर आहेत, ज्यांना विकासाच्या प्रवाहामध्ये सहजासहजी येता येत नाही, अशा गरजवंत मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळाले पाहिजे. ही मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभा केला आहे. तो रास्ता असून आपला त्यास पाठिंबा असल्याचे मत स्वप्निल (अण्णा) अनिल जाधव युवा मंचच्या वतीने स्वप्निल जाधव यांनी व्यक्त केले आहे. प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, समाजातील सर्वच गरीब घटकांना शिक्षणामध्ये संधी मिळाली पाहिजे. सध्याच्या सरकारने विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी चुकीच्या पद्धतीने आरक्षण देऊन मराठा समाजाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न केले आहेत. ते प्रयत्न वेळीच मनोज जरांगे पाटील यांना समजले आणि त्यांनी आपली ठाम मागणी कायम ठेवली आहे. त्यांची मागणी मराठा समाजाच्या हितासाठी असून आपला त्याला पाठिंबा आहे. असे पत्र स्वप्निल (अण्णा) अनिल जाधव युवा मंच महाराष्ट्र चे राज्यकार्य अध्यक्ष स्वप्निल अनिल जाधव यांनी दिले आहे.
समाजातील जे जे घटक दुर्बल वाटतात, त्या सर्व घटकांना प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहणार आहोत. राजकारणी लोक खोटे आश्वासन देतात, मी तशा पैकी नाही. मी प्रत्यक्ष ते कृतीत आणून दाखवू शकतो. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित होत असताना जाहीरपणे पाठिंबा देऊन आपली भूमिका स्पष्ट करणारे ते उदगीर विधानसभा मतदारसंघातील पहिले इच्छुक उमेदवार आहेत, असे म्हटले तर वावगे होणार नाही.
स्वप्निल जाधव यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीने निश्चितच त्यांचे कौतुक केले जाईल. अशी चर्चाही ग्रामीण भागात चालू आहे.