सात गुन्ह्यात फरार असलेल्या कुख्यात आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. त्याने चोरलेल्या 7 मोटारसायकली जप्त.

0
सात गुन्ह्यात फरार असलेल्या कुख्यात आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. त्याने चोरलेल्या 7 मोटारसायकली जप्त.

सात गुन्ह्यात फरार असलेल्या कुख्यात आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. त्याने चोरलेल्या 7 मोटारसायकली जप्त.

लातूर (एल.पी.उगीले) : मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्याच्या संदर्भात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सतत पाठपुरावा करून सात गुन्ह्यात फरार असलेल्या अट्टल आरोपीस अटक करण्यात यश मिळवले आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांनी जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.
पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषतः मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते . त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात सदर पथक माहितीचे संकलन करीत असताना, माहिती घेत असताना दिनांक 26/09/2024 रोजी पथकाला माहिती मिळाली की, लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दी मधून मोटारसायकल चोरीचे गुन्हे केलेला तसेच लातूर शहरातील एक ए.टी.एम. चोरण्याचा प्रयत्न केलेला गुन्हेगार करणसिंग लक्ष्मणसिंग बावरी हा त्याच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी संजयनगर येथील घरी आला आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने दिनांक 26/09/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संजयनगर येथील त्याच्या घरी पोहोचून करणसिंग लक्ष्मणसिंग बावरी याला ताब्यात घेऊन त्याने व त्याचे सोबत
अर्जुनसिंग लक्ष्मण सिंग बावरी, (वय 24 वर्ष, रा. संजय नगर, लातूर), अनिल धावारे, (रा. संजय नगर, लातूर) अशा तिघांनी मिळून लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून मोटारसायकली चोरून ते एकदाच विकण्यासाठी वैशाली नगर लातूर येथील एका मदरशाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानातील गवतामध्ये लपवून ठेवलेल्या 3 लाख 35 हजार रुपये किमतीच्या सात मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. पथकाने करणसिंग बावरी यांच्या ताब्यातून जप्त केलेल्या मोटार सायकल संदर्भाने विचारपूस केली असता सांगितले कि, सदरची मोटरसायकली लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केल्याचे सांगितले.
तसेच नमूद सराईत गुन्हेगार करणसिंग लक्ष्मणसिंग बावरी यांने वरील दोन साथीदारासह मिळून गणेश मंदिर, लातूर येथील एक पिकअप वाहन चोरून त्याच्या साह्याने बार्शी रोडवरील ए.टी.एम. तोडून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरून नमूद आरोपीचा विरुद्ध पोलीस ठाणे एमआयडीसी येथे पण गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा दाखल झाल्यापासून नमूद आरोपी फरार होता.
तसेच सराईत गुन्हेगार करणसिंग बावरी हा पोलीस ठाणे निलंगा, शिरूर आनंतपाळ, गांधी चौक, एमआयडीसी येथील प्रत्येकी एक गुन्ह्यात तर पोलीस ठाणे विवेकानंद चौक येतील दाखल तीन गुन्ह्यात फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कार्यवाहीमुळे बऱ्याच कालावधीनंतर करणसिंग बावरी हा पोलिसाच्या तावडीत सापडला असून त्याला ताब्यात घेऊन पुढील तपास केल्याने अनेक गुन्ह्याची उकल होणार आहे. नमूद आरोपीला पुढील कार्यवाहीस्तव पोलीस ठाणे गांधी चौक यांचे ताब्यात देण्यात आले आहे. संबंधित पोलीस ठाणेचे पोलीस पुढील तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार राहुल सोनकांबळे, रियाज सौदागर, योगेश गायकवाड, साहेबराव हाके, मनोज खोसे, राहुल कांबळे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, संतोष खांडेकर यांनी पार पाडली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *