मंत्र्यांच्या निमंत्रणाकडे चेअरमन संघटनेने फिरवली पाट !

0
मंत्र्यांच्या निमंत्रणाकडे चेअरमन संघटनेने फिरवली पाट !

मंत्र्यांच्या निमंत्रणाकडे चेअरमन संघटनेने फिरवली पाट !

उदगीर (प्रतिनिधी) : येथील एका खाजगी मंगल कार्यालयात उदगीरचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे मंत्री ना.संजय बनसोडे यांनी विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन यांच्या सोबत संवाद बैठक व स्नेहभोजन मेळावा आयोजित केला होता.तालुक्यातील चेअरमन संघटना सर्वसामान्य शेतकऱ्याचे हित विचारात घेऊन सोयाबीन पिकविम्यासाठी आक्रमक असून, वेळोवेळी उदगीरमध्ये निदर्शने केली आहेत. तब्बल २ महिन्यानंतर मंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे समजले. मंत्र्यांनी शेतकऱ्यांची आणि चेअरमन संघटनेच्या मागणीकडे पाठ फिरवल्यामुळे आता बैठकीचे नियोजन केले मात्र चेअरमन संघटनेने पाट फिरवली.
यावर बोलताना कौळखेडचे चेअरमन मन्मथ कोणमारे यांनी सांगितले की, चेअरमन संघटना गेल्या दोन महिन्यांपासून पिकविम्यासाठी व शेतकऱ्यांच्या इतर मागण्यासाठी आंदोलन करीत आहे. यावर जर चर्चा करायची असेल, तर ती शासकीय विश्रामगृह, तहसील कार्यालय, कृषी कार्यालय याठिकाणी बैठक लावणे अपेक्षित आहे. एका खाजगी मंगल कार्यालयात बैठक आयोजित करून आपल्या कार्यकर्त्यांकडून फोनद्वारे ऐनवेळी बैठकी साठी चेअरमन मात्र उदासीन आहेत आणि त्यांनी या सर्व प्रकारावर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. मंत्र्यांनी नियोजित केलेल्या बैठकीला टाळून विशेषतः तिथे स्नेहभोजनासाठी बोलावणे आम्हाला पटले नाही, आणि आम्ही शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी लढत असून स्नेहभोजन करण्यात आम्हास कसलाच रस नाही. आपण शासकीय कार्यालयात आम्हास चर्चेसाठी बोलवा, आम्ही तिथे उपस्थित राहू असे मत त्यांनी मांडले.
गंगापूरचे चेअरमन विवेक जाधव यांनी सांगितले की, सदर बैठकीसाठी जाण्यास चेअरमन संघटनेने सर्वानुमते बहिष्कार टाकला आहे. हुतात्मा स्मारक येथे बोलताना ना.बनसोडे साहेबांनी, “पिकविमा आंदोलन हे विनाकारण केले जात आहे, यात माझी कसलीच चूक नाही, आंदोलक विष पेरण्याचे काम करीत आहेत.” असा आरोप आंदोलकांवर केला आहे. आज आरोप करायचा – आणि उद्या स्नेहभोजनास बोलवायचे, ही मंत्रीसाहेबांची दुटप्पी भूमिका पटली नसल्याने सर्वानुमते या भोजनावर संघटनेने बहिष्कार टाकल्याची माहिती दिली.
यावेळी चेअरमन संघटनेला मेळाव्यास निमंत्रित करण्यासाठी कृषी विभागाचे प्रतिनिधी आले असता, ही जर प्रशासकीय बैठक असेल तर, ती शासकीय कार्यालयात न लावता – खाजगी मंगल कार्यालयात का लावण्यात आली? असे प्रश्न उपस्थित चेअरमन यांनी केला.
यावेळी बसवराज पाटील मलकापूरकर, शिरीषकुमार पाटील, शिवाजी पाटील, ज्ञानेश्वर भांगे, संगमेश्वर मिटकरी, नामदेव बिरादार, व्यंकट ढगे, रामराव पाटील, गजानन बिरादार, गंगाधर बिरादार, धोंडीबा डावळे, हणमंत मुंडे, ज्ञानोबा गुरमे, प्रल्हाद महाजन, रोहिदास लोहारे, रामराव राठोड, व्यंकट पाटील, शेषराव हेळगे, लक्ष्मणराव सोनवळे, कैलास पाटील, शिवाजी गुरमे, बापूराव राठोड, कलावती बोने, गणेश शेटकार, अण्णाराव गंभीरे, शिवाजी नीडवांचे, ज्ञानेश्वर गायकवाड, तानाजी डावले, शिवराज पाटील, प्रदीप पाटील, गुरुनाथ आंबेगावे, वीरभद्र पाटील, वैजनाथ केसगिरे, अशोकराव माने यांच्यासह तालुक्यातील चेअरमन उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *