शिवाजी महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यापीठात सर्व प्रथम
उदगीर (प्रतिनिधी) : शिवाजी महाविद्यालयाचे विद्यार्थी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड ने घेतलेल्या एम.कॉम च्या अंतिम वर्षाच्या उन्हाळी 2024 या परिक्षेत सर्वप्रथम व सर्व तृतीय आले. त्यामध्ये कु. तनुजा रामराव तेगमपुरे ही विद्यापीठातून सर्व प्रथम व कु. अंजली विजयकुमार सूर्यवंशी हिने सर्वतृतीय येण्याचा मान मिळवून यश संपादन केले. विद्यापीठात सर्वप्रथम व सर्व तृतीय येऊन महाविद्यालयाच्या यशात सन्मानाचा तुरा रोवला आहे. किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर,सचिव पी, टी. शिंदे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ .अरविंद नवले, उपप्राचार्य डॉ.आर.एम. मांजरे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ.ह.वा. कुलकर्णी,वाणिज्य विभागातील प्रा. डॉ. डी. बी कोनाळे,प्रा. संतोष खरात, प्रा.गणेश बेद्रे,प्रा.राजेश पवार ,प्रा. सौ. मयुरी चिवटे ,प्रा.अंजली पाटील ,प्रा.श्रुती चींतळघट , प्रबंधक बालाजी पाटील अधीक्षक व्ही.डी.गुरनाळे, लाडके आर.एम., धनराज पाटील ,सतीश बापुरे तसेच शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.