माहिती अधिकारातून नागरिकांनी माहिती मिळवावी – रंगा राचुरे
उदगीर (एल.पी.उगीले) सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविण्यासाठी केंद्रीय माहिती आयोग व राज्य माहिती आयोग याची रचना करण्यात आली. माहिती सुरक्षित करण्यासाठी नागरिकांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करण्यासाठी माहिती अधिकाराचा तरतूद करणारा कायदा 15 जून 2005 रोजी अस्तित्वात आला. या कायद्यातून नागरिकांनी माहिती मिळवावी असे आवाहन शिवाजी महाविद्यालयातील व्याख्यान प्रसंगी व्याख्याते ज्येष्ठ समाजवादी विचारवंत रंगा राचुरे यांनी केले. माहिती अधिकार दिन कार्यक्रमाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन ठेवण्यात आलेले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरविंद नवले होते. यावेळी उपप्राचार्य डॉ.मांजरे आर.एम. यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना रंगा राचुरे म्हणाले, या कायद्याद्वारे नागरिकांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायासाठी जागरूक राहावे असेही ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमाला डॉ .व्ही.डी. गायकवाड,डॉ.एस. एम. कोनाळे,प्रा.बालाजी सूर्यवंशी,अधीक्षक व्हि.डी. गुरनाळे, आर.एम.लाडके, प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक डॉ.सुरेश शिंदे यांनी तर आभार सहसंयोजक डॉ.डी.बी. मुळे यांनी मानले.