महावितरण कनिष्ठ अभियंत्यास मारहाण करून जिवे मारण्याची धमकी ; एका वर गुन्हा दाखल

0
महावितरण कनिष्ठ अभियंत्यास मारहाण करून जिवे मारण्याची धमकी ; एका वर गुन्हा दाखल

महावितरण कनिष्ठ अभियंत्यास मारहाण करून जिवे मारण्याची धमकी ; एका वर गुन्हा दाखल

अहमदपूर ( गोविंद काळे ) तालुक्यातील हाडोळती येथील महावितरण कार्यालयात तालुक्यातीलच हिप्पळगाच्या एका इसमाने माझ्या शेतातील पोल झुकला आहे तो लवकर सरळ करून दे असे म्हणुन महावितरण कार्यालयातील एका कनिष्ठ अभियंत्यास कर्मचाऱ्यासमोर चापटाने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची घटना दि २७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ : ३० वाजता घडली असुन अहमदपूर पोलीसात एका इसमा विरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आहे.

याविषयी पोलीस सुत्राकडून मिळालेली माहीती अशी की, अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील महावितरण कार्यालयात दि २७ सप्टेंबर रोजी दुपारी १२:३० वाजता अहमदपूर तालुक्यातील हिप्पळगाव येथील रहीवाशी असलेले कृष्णा जाधव यांनी कार्यालयात येऊन माझ्या शेतातील लाईटचा पोल झुकलेला आहे तो कधी सरळ करणार आहात अशी विचारणा केल्यानंतर कनिष्ठ अभियंता अमोल प्रकाश सुर्यवंशी यांनी मी माझ्या लाईनमन यांना सांगीतले आहे आज दुपार पर्यत तुमच्या शेतातल्या झुकलेल्या पोलचे काम होऊन जाईल असे म्हणताच कृष्णा जाधव यांनी काही न ऐकता कार्यालयातील साहीत्याची तोडफोड करून शासकीय कामात अडथळा आणुन कनिष्ठ अभियंता अमोल सुर्यवंशी यांना चापटाने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद दिली दिलेल्या फिर्यादी वरून अहमदपूर पोलीसात सदरील आरोपी विरूद्ध भारतीय न्याय संहिंता ( बि. एन.एस ) २०२३ कलम १३२, १२१(1),३२४(४),३२४(५), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोकॉ हनुमंत आरदवाड करीत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *