शिरुर ताजबंद, येथे रविवारी मोफत सर्व रोगनिदान व औषधोपचार तथा नेत्ररोग-मोतीबिंदू व रक्त-लघवी-ई.सी.जी तपासणी शिबिर

0
शिरुर ताजबंद, येथे रविवारी मोफत सर्व रोगनिदान व औषधोपचार तथा नेत्ररोग-मोतीबिंदू व रक्त-लघवी-ई.सी.जी तपासणी शिबिर

शिरुर ताजबंद, येथे रविवारी मोफत सर्व रोगनिदान व औषधोपचार तथा नेत्ररोग-मोतीबिंदू व रक्त-लघवी-ई.सी.जी तपासणी शिबिर

अहमदपूर (गोविंद काळे) : बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ,अहमदपूर द्वारा संचलित धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर यांच्या वतीने शिवपार्वती मंगल कार्यालय,महेश मंदिर,शिरूर ताजबंद,ता:-अहमदपूर येथे रविवार,दिनांक:-२९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ठीक १०.३० ते दुपारी ०४.३० या दरम्यान मोफत सर्व रोगनिदान व औषधोपचार तथा नि:शुल्क मोतीबिंदू व रक्त-लघवी-ई.सी.जी तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शक माजी मंत्री बाळासाहेब जाधव; अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय-कार्यसम्राट आमदार बाबासाहेब पाटील;सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सुभाष भगवानराव पाटील यांच्यासह राजकीय,सामाजिक,आरोग्य-वैद्यकीय,शैक्षणिक,सहकार,ईत्यादी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शिबिरामध्ये विविध चिकित्सा पद्धतीचे तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टर्स वातविकार,संधिवात,आमवात,आम्लपित्त,मधुमेह,त्वचा विकार,कान-नाक-घसा चे आजार,हृदयरोग,पोटाचे विकार,लहान बालकांचे आजार व स्त्रीयांचे विकार-मासिकपाळी,स्तन व गर्भाशयाचे आजार,मानसिक आजार,कर्करोग,अस्थिरोग,यकृताचे विकार,वंध्यत्व व लैंगिक समस्या इत्यादी आजारांच्या रुग्णांवर आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार व मार्गदर्शन करणार आहेत.

शिबिरामध्ये नोंदणी केलेल्या महिलांची मोफत(नि:शुल्क)कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया नि:शुल्क(मोफत)केली जाईल आणि तसेच प्रसुती(बाळंतपण) व गर्भाशयासंबंधीत विकारांची शस्त्रक्रिया तथा अपेंडिक्स,हर्निया,हायड्रोसिल,मुळव्याध व भगंदर या शस्त्रक्रिया अल्प(५०% सवलत)दरात धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज,श्रीकृष्ण मंदिरासमोर,देगलूर रोड,उदगीर येथे केली जाणार आहे.

शिबिरामध्ये लॉयन्स नेत्र रुग्णालय,उदगीर यांच्या सहकार्याने मोफत नेत्ररोग तपासणी करून मोतीबिंदू आजाराचे निदान झालेल्या व नोंदणी केलेल्या व्यक्तींवर अल्प दरात औषधोपचार व शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात येणार आहेत.

तरी या मोफत शिबिराचा रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन बाळ भगवान शिक्षण प्रसारक मंडळ,अहमदपूर चे संचालक मंडळ तथा धन्वंतरी आयुर्वेद मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर चे प्राचार्य,सर्व डॉक्टर्स व शिक्षकेत्तर-रुग्णालयीन कर्मचारी यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *