संत ज्ञानेश्वर विद्यालयात माणूस घडवणारी कथाकथन कार्यशाळा संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात कथाकथन तंत्र आणि मंत्र या विषयावरती विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी कथेच्या माध्यमातून नैतिक मुले रुजवून माणूस घडविणारी कथाकथन कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव प्राचार्या रेखाताई तरडे- हाके, प्रमुख अतिथी म्हणून साने गुरुजी कथामालेचे प्रांताध्यक्ष दिपक बलसुरकर, कथाकथन स्पर्धा परीक्षेचे विभागप्रमुख संतोष कुलकर्णी, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते देवेंद्र देवणीकर, लिनेस क्लबच्या अध्यक्षा सुनंदा कुलकर्णी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यशाळेच्या प्रारंभी प्रमुख मार्गदर्शकांचा विद्यालयाच्या वतीने शाल व वृक्षाचे रोपटे देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी साने गुरुजी कथामालेचे प्रांत अध्यक्ष दिपक बलसुरकर यांनी विद्यार्थ्यांना मनोरंजक कथा सांगून सर्वांनाच मंत्रमुग्ध केले .
संतोष कुलकर्णी व देवेंद्र देवणीकर यांनी वर्ग प्रतिनिधींना नेतृत्व गुण विकासाचे प्रशिक्षण दिले. दुपार सूत्रामध्ये संतोष कुलकर्णी व दिपक बलसुरकर सरांनी ‘कथाकथन तंत्र आणि मंत्र’ या विषयावर मार्गदर्शन केले. गीतकथा, नाट्य कथा, संगीत कथा, बोल कथा, असे कथेचे अनेक प्रकार सांगून कथा कशा सांगाव्यात, कथेची माध्यम, कथा ही वयोगटांनुसार कशी बदलत जाते.कथा हे उद्दिष्ट पूर्तीचे एक उत्तम साधन आहे. शब्द संपदा, वक्तृत्व, अभिनय बहुश्रुतपणा, चित्रमयता आवाजाची तयारी,हावभाव याविषयी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक मुख्याध्यापिक आशा रोडगे यांनी सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी तर आभार संगीता आबंदे यांनी मानले.
शेवटी आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई,जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही। या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.