लातुर लोकसभेतील अहमदपूर, निलंगा,लोहा-कंधार विधानसभा शिवसेना लढवणार- सौ. सुषमाताई अंधारे

0
लातुर लोकसभेतील अहमदपूर, निलंगा,लोहा-कंधार विधानसभा शिवसेना लढवणार- सौ. सुषमाताई अंधारे

लातुर लोकसभेतील अहमदपूर, निलंगा,लोहा-कंधार विधानसभा शिवसेना लढवणार- सौ. सुषमाताई अंधारे

अहमदपूर (गोविंद काळे) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अहमदपूर येथील संस्कृती मंगल कार्यालयात स्त्री शक्ती संवाद व बुथ प्रमुख,गट प्रमुख शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्या प्रसंगी शिवसेना उपनेत्या तथा लातूर जिल्हा पक्ष निरीक्षक सुषमाताई अंधारे बोलत होत्या, महाराष्ट्र राज्यात सत्ता बदल करण्याची योग्य वेळ आलेली आहे. स्त्रीयावर होणारे अन्याय, अत्याचार, महागाई, शेतकरी, शेतमजूर, बिरोजगारी, यांच्या संख्येत झालेली वाढ, फसव्या योजना जाहीर करून महाराष्ट्र राज्यातील जनतेची फसवणूक करण्यात येत आहे. दोन तीन महिन्यांच्या योजना म्हणजे लाडकी बहिण योजने सारख्या योजना जाहीर करण्यापेक्षा सुरक्षित महिला योजना जाहीर करा शिंदे, फडणवीस तुम्ही राज्यातील जनतेला समजून घेऊ शकत नाहीत का? हि जनता महाविकास आघाडी सोबत आहे. कारण महाराष्ट्र राज्यातील गावगाड्यात प्रत्येक जाती धर्मात फूट पाडण्याचं काम या शिंदे आणि फडणवीस यांनी केलं आहे, भाजप आरक्षणावर बोलून फसला आहे दोन महिन्यात आरक्षण देतो म्हणणाऱ्या फडणवीसांनी दोन अडीच वर्षात आरक्षण दिलं नाही जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर ते आरक्षण केंद्र सरकार संसदेमध्ये ठराव मांडून कायद्यात योग्य बदल करून आरक्षण देऊ शकतं, विरोधी पक्ष आरक्षण देऊ शकत नाही. फडणवीस तुम्ही हा मराठा समाजाचा प्रश्न सोडवा मराठा आरक्षणावरून गाव गाड्यात भांडणं लावून तुम्ही स्वतः राजकारणाची पोळी भाजत आहात हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. महाराष्ट्र राज्यातील कायदा व सुरक्षा बाधित झालेली आहे, पोलिसांना आपल्या पराक्रमानुसार काम करता येत नाही. स्त्रियावर अन्याय अत्याचार वाढले आहेत. देशातील महापुरुषांचा अवमान केला जात आहे. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तासी ४५ कि.मी.वेगाने वारा वाहत असल्यामुळे तो पुतळा पडला असे विधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे करत आहेत. तासी ४५ वेगाने येणाऱ्या वाऱ्यामुळे नारळाच्या झाडावरील नारळ पडू शकत नाही, पुतळा कसा पडला हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
यापुढे महाराष्ट्र राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी , स्त्रियांची सुरक्षा, महापुरुषांची सुरक्षा कायम राखण्यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गांभीर्याने लढून अहमदपूर विधानसभेवर भगवा झेंडा फडकविण्यासाठी प्रयत्न करावा, कारण लातूर जिल्ह्यात अहमदपूर विधानसभा मतदारसंघात पक्षीय बलाबल सर्वोत्कृष्ट आहे, त्यामुळे अहमदपूर विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटेल याची मी खात्री देते, प्रत्येक शिवसैनिकाने स्वता उमेदवार आहे असे समजून मैदानात उतरुन लढाई जिंकून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री कराव असे आवाहन केले.
या मेळाव्यासाठी शिवसेना उपनेत्या सौ. अस्मिताताई गायकवाड, लातुर जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजी आमदार रोहिदास चव्हाण, महिला आघाडी संपर्क प्रमुख संपदा गडकरी,महिला सहसंपर्क प्रमुख अरुणाताई लेंडाणे, शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, महिला जिल्हा संघटक सुनिता चाळक, जयश्री उटगे, जिल्हा सचिव विलास पवार, श्रीमंत सोनाळे, सचिन साबणे,समन्वयक प्रकाश हैबतपुर युवा सेना जिल्हा युवा अधिकारी लक्ष्मण पेटकर, युवा सेना जिल्हा सरचिटणीस रमण माने, जिल्हा कार्यालय प्रमुख सुभाष गुंडिले, उपजिल्हा प्रमुख अंकुश कोनाळे,भारत सांगवीकर, बाळासाहेब डोंगरे , विधानसभा संघटक कृषी त्पन्न बाजार समिती संचालक संतोष रोडगे सर, मन्मथ धुळशेट्टे, विधानसभा समन्वयक निलेश मद्रेवार तालुका प्रमुख चंद्रकांत टेंगेटोल, मुक्तेश्वर येवरे पाटील, दत्ता हेंगणे, नंदकुमार पवार, परमेश्वर सूर्यवंशी, कैलास पाटील, अंगद पवार ,शहर प्रमुख नितीन धुळशेट्टे, अनिल पंचाक्षरी, उप तालुका प्रमुख अनिल लामतुरे, तिरुपती पाटील ,शिवा कासले, अभंग मोठे ,नगरसेवक संदीप चौधरी ,शुगंध बुकटे, संजय इगे, पद्माकर पेंढारकर, शिवकुमार बेंद्रे, शिवा भारती, व्यंकट साबणे, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माऊली देवकते अनिल फुलारी, विठ्ठल फुलारी ,आजय सुरनर, पवन देऊळकर,, शंकर धोंडापुरे महादेव काळे ,गणेश चव्हाण, वैभव कुलकर्णी, गणेश राठोड , मारुती बिराडे, मनोज चामे, इंदुताई पाटील, सुधाकर जायभाय, सविता भुरे, गजानन येणे ,सुधाकर बारवाड , दामोदर घोरपडे ,दत्ता मध्धेवाढ, धनंजय तुडमे, बबन फुलमनटे, कालिदास कालिदास धुळगुंडे, औरादे,,ांच्यासह जिल्ह्यातील आजि माजी पदाधिकारी, महिला आघाडी, शिवसैनिकांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संतोष रोडगे सर यांनी केले,सूत्रसंचालन अनिकेत फुलारी तर आभार गणेश माने यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *